शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामपूर्व बैठकीला भाजप लोकप्रतिनिधींची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 16:11 IST

शिवसेनेचे मंत्री असलेल्या आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत आयोजित खरीप हंगामपूर्व बैठकीला भाजपच्या लोकप्रतिनिधींनी दांडी मारली.  

ठळक मुद्देशुक्रवारी वाल्मी येथे पार पडलेल्या आढावा बैठकीकडे भाजपचे स्थानिक आमदार, नेते कोणीच फिरकले नाही.

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या वतीने वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहेत. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीही दिली आहे. मात्र, जिल्ह्यातील आमदारांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असे चित्र शुक्रवारी दिसले. शिवसेनेचे मंत्री असलेल्या आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत आयोजित खरीप हंगामपूर्व बैठकीला भाजपच्या लोकप्रतिनिधींनी दांडी मारली.  

जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीला जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी हजर राहणे अपेक्षित असते. कृषी विभागाचे नियोजन समजून घेणे व आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे हीच अपेक्षा लोकप्रतिनिधीकडून असते. मात्र, शुक्रवारी वाल्मी येथे पार पडलेल्या आढावा बैठकीकडे भाजपचे स्थानिक आमदार, नेते कोणीच फिरकले नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, खा. चंद्रकांत खैरे, आ. अब्दुल सत्तार, आ. संदीपान भुमरे, महापौर नंदकुमार घोडेले, जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर व शिवसेनेचे अंबादास दानवे यांचीच उपस्थिती होती. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरील बैठकीत भाजप व शिवसेनेतील काही आमदारांची अनुपस्थिती सर्वांना खटकली. आ. अब्दुल सत्तार यांनी यावरील आपली खंत व्यक्त केली. पालकमंत्री शिवसेनेचे असल्यामुळे सत्ताधारी पक्षाचे अन्य लोकप्रतिनिधी आले नाहीत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. खाजगीत बोलताना खा. खैरे म्हणाले की, खुद्द विधानसभेचे अध्यक्ष आज शहरात आहेत. त्यांनी तरी बैठकीत यायला पाहिजे होते.  पालकमंत्र्यांनी जरी दोन्ही पक्षांत सर्व आलबेल असल्याचे सांगितले असले तरीही बैठकीत आलेल्यांमध्ये दोन्ही पक्षांतील वाद एवढे टोकाला गेले, की पालकमंत्र्यांनी बोलविलेल्या  बैठकीलाही भाजपचे आमदार, लोकप्रतिनिधी हजर राहिले नाहीत, अशीच चर्चा सुरू होती.

वैयक्तिक कारणाचा खुलासापत्रकारांनी पालकमंत्र्यांना विचारले असता, पालकमंत्री डॉ. सावंत यांनी सारवासारवीचे उत्तर दिले. शिवसेना व भाजपचे संबंध चांगले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये काहीच वाद नाही. सर्व काही आलबेल आहे. भाजपचे आमदार व अन्य लोकप्रतिनिधी त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे बैठकीला येऊ शकले नाहीत, असा खुलासाही त्यांनी केला. शिवसेना-भाजपत चांगले संबंध असल्याने मी चांगल्या प्रकारे खरीप हंगाम बैठकीत बोलू शकलो, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

टॅग्स :BJPभाजपाAgriculture Sectorशेती क्षेत्रAtul Saaveअतुल सावेdr. deepak sawantदीपक सावंतguardian ministerपालक मंत्री