शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

फुलंब्रीत सरळ लढतीत भाजपाची हॅटट्रिक; मतदारसंघाला मिळाल्या पहिल्या महिला आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 18:15 IST

फुलंब्री मतदारसंघात मागील २० वर्षांपासून काँग्रेस-भाजपाच्या उमेदवारात सरळ लढत होत होती. यात हरिभाऊ बागडे व डॉ. कल्याण काळे हेच समोरासमोर उभे होते.

फुलंब्री : फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांचा ३२ हजार मतांनी पराभव करून मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान मिळविला. तसेच भाजपाने या माध्यमातून विजयाची हॅटट्रिक केली.

फुलंब्री मतदारसंघात मागील २० वर्षांपासून काँग्रेस-भाजपाच्या उमेदवारात सरळ लढत होत होती. यात हरिभाऊ बागडे व डॉ. कल्याण काळे हेच समोरासमोर उभे होते. पण, यंदाच्या निवडणुकीत हे दोन्ही नेते निवडणूक रिंगणाबाहेर असल्याने भाजपाच्या वतीने अनुराधा चव्हाण यांनी तर, काँग्रेसच्या वतीने विलास औताडे यांनी निवडणूक लढविली. निवडणूक प्रचारादरम्यान शिंदे सेनेचे बंडखोर रमेश पवार यांच्या नावाची चर्चा अधिक झाली. परंतु निकालात पवार यांना मतदारांनी फारसा थारा दिला नाही. त्यामुळे काँग्रेस व भाजपातच सरळ लढत झाली. निवडणूक प्रचारात भाजपाने विकासाचे मुद्दे उपस्थित केले. यात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या कार्यकाळातील कामे आणि अनुराधा चव्हाण यांनी जि.प. सभापती असताना व बाजार समितीच्या सभापती असताना केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. दुसरीकडे काँग्रेसचे विलास औताडे यांनी विकास कामांऐवजी भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. ही बाब मतदारांना पटली नाही. त्यामुळे मतदारांनी भाजपाला साथ दिली. तसेच लाडक्या बहिणींनी भरभरून आशीर्वाद दिले.

फुलंब्री उमेदवारनिहाय मतदानउमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मतेअनुराधा अतुल चव्हाण- भाजपा- १,३४,०६५विलास केशवराव औताडे- काँग्रेस- १,०२,५७२रमेश देविदास पवार-अपक्ष-१३,०१०वंचित बहुजन आघाडी- महेश निनाळे-६,१७०अमोल रमेश पवार- बहुजन समाज पार्टी- १,५३१बलासाहेब तातेराव पाथ्रीकर- मनसे-८४३डॉ. कैलाशचंद्र जनार्दन बनसोडे- विदुलथाई चीरुथगल काटची-२५६चंद्रकांत दामोदर रुपेकर-रिपब्लिकन सेना-७४०दिनकर भीमराव खरात- आझाद समाज पार्टी-६३६रमेश एकनाथ काटकर- राष्ट्रीय समाज पार्टी- १,११५रमेश उत्तम वानखडे-ओळ इंडिया फोरवर्ड ब्लॉक-१०७सुनील दिलीप साळवे-पीपल्स पार्टी ऑफ इंडिया-१८२अनिसखां हबीबखां पठाण- अपक्ष-२१४अब्दुल हनीफ नाईकवाडी- अपक्ष-६७५ॲड. अंजली साबळे- अपक्ष-३९२मारोती दशरथ कांबळे- अपक्ष- ३००जगन्नाथ गावनाजी काळे- अपक्ष- ९३५तौफिक रफिक अहेमद- अपक्ष- ९६८नयुम शेख- अपक्ष- ३७५मंगेश साबळे- अपक्ष- १३७७राहुल नारायण भोसले- अपक्ष- २२३लक्ष्मण एकनाथ गिरी- अपक्ष- १६९लक्ष्मण सोनाजी कांबळे- अपक्ष- १४९विशाल कडूबा पाखरे- अपक्ष- १४३सय्यद हरून गफूर- अपक्ष- ३००सलीम शहा भिकन शहा- अपक्ष- १८५संजय बाबुराव चव्हाण- अपक्ष- १७८नोटा: ९२८एकूण मते २,६९,७८५यात टपाली मतदानाचा समावेश आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024phulambri-acफुलंब्रीmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक