शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

भाजपात इनकमिंग सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:57 IST

स्थानिक आमदारांच्या कार्यपद्धतीवर टीका करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांच्यापाठोपाठ सेनचे महानगराध्यक्ष बाळू खोमणे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: स्थानिक आमदारांच्या कार्यपद्धतीवर टीका करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांच्यापाठोपाठ सेनचे महानगराध्यक्ष बाळू खोमणे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. मुंबईत बुधवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत ११ नगरसेवक आणि शिवसेनेच्या दोन पदाधिकाºयांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे.विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री डॉ़माधवराव किन्हाळकर, माजी खा़भास्करराव पाटील खतगावकर, सुभाष वानखेडे, माजी आ़ओमप्रकाश पोकर्णा आदी प्रमुख नेत्यांनी भाजपात प्रवेश घेतला होता़ नांदेडमध्ये १४ आॅगस्ट रोजी काँग्रेसच्या ४, सेनेच्या ४ आणि राष्टÑवादीच्या २ नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे देत भाजपाची वाट धरली होती. त्यात काँग्रेसच्या नवल पोकर्णा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देऊन ही संख्या ११ वर नेली. १४ आॅगस्ट रोजीच शिवसेनेचे नांदेड उत्तरचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांनी सेनेला जय महाराष्टÑ केला होता. त्यात बुधवारी महानगराध्यक्ष बाळू खोमणे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. १८ वर्षे शाखाप्रमुख ते महानगराध्यक्ष, विरोधी पक्षनेता आदी पदांवर काम केले़ मात्र विद्यमान सेना आमदारांकडून कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे़ याबाबत वरिष्ठांना कळवूनही काही झाले नाही़ परिणामी आपल्याला पक्ष सोडावा लागत असल्याचे खोमणे यांनी सांगितले़मुंबईमध्ये शिवसेनेचे हे दोन पदाधिकारी आणि ११ नगरसेवकांना भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला. भाजपच्या दादर येथील पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भाजपाचे केंद्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, महापालिका निवडणूक प्रभारी तथा कामगारमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.भाजपामध्ये प्रवेश घेणाºयांमध्ये काँग्रेसचे नगरसेवक सरजितसिंघ गिल, किशोर यादव, अन्नपूर्णा ठाकूर, स्नेहा पांढरे आणि नवल पोकर्णा यांचा तर शिवसेनेचे नगरसेवक दीपकसिंह रावत, विनय गुर्रम, वैशाली देशमुख, ज्योती खेडकर तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप चिखलीकर व श्रद्धा चव्हाण यांचा समावेश आहे. मनसेचे माजी जिल्हाप्रमुख विनोद पावडे यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे.या प्रवेश सोहळ्यास भाजपा महानगराध्यक्ष संतुकराव हंबर्डे, आ. तुषार राठोड, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, दिलीप कंदकुर्ते, चैतन्य देशमुख, श्यामसुंदर शिंदे, प्रवीण साले, संजय कौडगे, डॉ. अजित गोपछडे आदींची उपस्थिती होती.त्याचवेळी सिडकोतील राष्टÑवादीच्या नगरसेविका इंदुताई घोगरे आणि शिवसेनेच्या नगरसेविका सुदर्शना खोमणे यांचे राजीनामेही जवळपास निश्चित असून या दोन्ही नगरसेविकांच्या कुटुंबियांनी मुंबईमध्ये झालेल्या सोहळ्यात भाजपामध्ये प्रवेश केला आहे.