शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

‘भाजपा शिवसेनेला बदनाम करीत आहे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:21 IST

सेनेचे आमदार, नगरसेवक जागेवरच असून भाजपातील प्रवेशाबद्दल वावड्या उठवून सेनेला बदनाम करण्याचे काम भाजपच करीत असल्याची टीका शिवसेना नेते पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले़ चहाच्या माध्यमातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पक्ष फोडण्याचे प्रयत्न करीत आहेत़ आगामी विधानसभा निवडणुकीत दानवेंना त्यांच्याच मतदारसंघात पाणी पाजा असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : सेनेचे आमदार, नगरसेवक जागेवरच असून भाजपातील प्रवेशाबद्दल वावड्या उठवून सेनेला बदनाम करण्याचे काम भाजपच करीत असल्याची टीका शिवसेना नेते पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले़ चहाच्या माध्यमातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पक्ष फोडण्याचे प्रयत्न करीत आहेत़ आगामी विधानसभा निवडणुकीत दानवेंना त्यांच्याच मतदारसंघात पाणी पाजा असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले़आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे तीन मंत्री शनिवारी नांदेडमध्ये दाखल झाले़ त्यात पर्यावरणमंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा समावेश होता़ या मंत्र्यांनी तीन मेळावे आणि नगरसेवकांच्या बैठकीत शिवसैनिकांना आगामी निवडणुकीत महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले़ शहरातील महात्मा फुले मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात पर्यावरणमंत्री कदम यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दानवे हे चहा पिण्यास जाऊन फोडाफोडीचे राजकारण करीत आहेत़ त्यांना धडा शिकवण्यासाठी आता त्यांच्याच मतदार संघात त्यांना पाणी पाजण्याची वेळ आली असल्याचे सांगितले़ सेनेवर जातीयवादी पक्ष असल्याची टीका केली जात आहे़ मात्र या शिवसेनेने १९९६ मध्ये सत्ता असताना साबेर शेख यांना मंत्री केले़ नांदेडचे ते पालकमंत्री असल्याचीही आठवण त्यांनी करून दिली़ काँग्रेसची महापालिकेवर सत्ता आहे मात्र नांदेडचा गुरू-ता-गद्दी कालावधीत झालेला विकास कुठे गेला असा सवालही त्यांनी उपस्थित केला़ २ हजार कोटी आले असतानाही आज गोदावरी अशुध्दच आहे़ शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे आहेत़ हाच विकास आहे का असा सवालही त्यांनी केला़ परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी काँग्रेसच्या ताब्यातून सत्ता हिसकावयाची आहे़ विरोधकांसोबत लढताना सेनेला घरभेद्यांशी लढावे लागणार असल्याचेही ते म्हणाले़ मराठवाड्यात बहुजन समाजाचे नेतृत्व तयार करण्याचे काम शिवसेनेने केले असल्याचेही त्यांनी सांगितले़ पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज पक्षाला ताकद देण्याची गरज असल्याचे सांगताना शिवसेना अभेद्य असल्याचेही ते म्हणाले़ जिल्ह्यात तरूणांची ताकद उभी राहत आहे़ पक्षावर निष्ठा ठेवून तसेच भगव्या झेंड्यावर विश्वास ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले़ सेनेची सत्ता आणण्यासाठी आपण महिनाभर नांदेडात तळ ठोकू असेही त्यांनी स्पष्ट केले़ प्रास्ताविकात आ़ हेमंत पाटील यांनी सध्या काही बांडगूळे उड्या मारत आहेत़ त्यांना त्यांची जागा दाखवावी लागणार आहे़ आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाचे सर्व मंत्री, आमदार नांदेडात येणार असून आवश्यक ती सर्व मदत केली जाणार असल्याचेही आ़ पाटील यांनी सांगितले़ यावेळी शिवसेनेचे नूतन संपर्क प्रमुख आनंद जाधव, आ़ सुभाष साबणे, प्रकाश कौडगे, धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख, प्रकाश मारावार, बालाजी कल्याणकर, विनय सगर, अशोक उमरेकर, विनय गुर्रम, बाळासाहेब देशमुख आदींची उपस्थिती होती़दरम्यान, नांदेड दक्षिणच्या झालेल्या मेळाव्यात उपरोक्त नेत्यांनी मार्गदर्शन केले़ सिडको येथेही मेळावा घेण्यात आला़ तर नगरसेवकांचीही एक बैठक घेवून मार्गदर्शन करण्यात आले़