शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीत पक्ष्यांची भरारी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 19:49 IST

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीतील नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष, जागोजागी पडलेला कचरा, झाडेझुडपे यामुळे परिसरात पक्ष्यांची संख्या वाढली आहे.

ठळक मुद्दे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे विमानतळ परिसरातील पक्ष्यांची भरारी विमानांसाठी धोकादायक ठरू पाहत आहे.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीतील नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष, जागोजागी पडलेला कचरा, झाडेझुडपे यामुळे परिसरात पक्ष्यांची संख्या वाढली आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे विमानतळ परिसरातील पक्ष्यांची भरारी विमानांसाठी धोकादायक ठरू पाहत आहे.

देशातील विविध विमानतळांच्या धावपट्टीवरून टेकआॅफ किंवा लँडिंग करताना विमानांना पक्ष्यांची धडक लागण्याचे प्रकार समोर आले आहेत. चिकलठाणा विमानतळावर रविवारी एका विमानाला पक्षाने धडक दिल्याची घटना समोर आली. चिकलठाणा विमानतळाच्या परिसरातील जयभवानीनगर, म्हाडा कॉलनी आदी भागांतून वाहणारे नाले विमानतळाच्या संरक्षक भिंतीजवळून आणि काही ठिकाणी थेट विमानतळाच्या परिसरातून जातात. नाले आणि परिसरात जागोजागी पडलेल्या कचऱ्यावर हे पक्षी वाढत असल्याचे दिसून येते. झाडेझुडपांतील कीटकरूपी खाद्यही पक्ष्यांना मिळते. त्यामुळे विमानतळाच्या हद्दीत छोट्या-मोठ्या आकाराच्या पक्ष्यांची संख्या वाढत आहे. याबाबत विमानतळ प्राधिकरणाने  वारंवार माहिती दिली, तरीही महापालिकेने या परिसराची स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष केले. 

मोकाट कुत्र्यांचाही प्रश्न कायमच्विमानतळाच्या संरक्षक भिंतीलगत असलेल्या नाले, परिसरातील कचऱ्यामुळे मोकाट कुत्र्यांचीही संख्या वाढत आहे. ही मोकाट कुत्रे अनेकदा विमानतळाच्या हद्दीत घुसखोरी करून थेट धावपट्टीवर येतात. त्यामुळे विमानतळावर मोकाट कुत्र्यांची वेळोवेळी धरपकड केली जात आहे; परंतु कुत्र्यांचे प्रमाण मात्र काही केल्या कमी होत नसल्याचे दिसत आहे.

लक्ष दिले जाईल पक्ष्याने धडक मारलेल्या घटनेची चौकशी होईल. चिकलठाणा विमानतळावर यापूर्वी अशी घटना झालेली नाही. यावर्षी परिसरात बगळे वाढले आहेत. पक्षी कुठूनही येऊ शकतात, तरीही या प्रश्नाकडे लक्ष दिले जाईल.- डी. जी. साळवे, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाairplaneविमान