शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकांना बायोमेट्रिक, विद्यार्थ्यांना ७५ टक्के हजेरी बंधनकारक; कुलगुरूंनी घेतला ‘तास’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 11:52 IST

विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक वर्षाला सोमवारी सुरुवात झाली. यानिमित्त कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पहिल्याच दिवशी विद्यापीठ, उपकेंद्रातील विभागप्रमुख, प्राध्यापकांची महात्मा फुले सभागृहात बैठक घेतली.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उपकेंद्रातील प्राध्यापकांना आठवड्यात ४० तास उपस्थित राहणे बंधनकारक आहे. वर्गावर तास घेणे, अभ्यासक्रम वेळेवर सुरू करून पूर्ण करणे, परीक्षा वेळेत घेण्याचे बंधनच कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी घातले. त्याशिवाय प्राध्यापकांना विभागात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली असून, विद्यार्थ्यांना ७५ टक्के उपस्थितीशिवाय परीक्षा अर्ज भरता येणार नसल्याची घोषणाही कुलगुरूंनी केली.

विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक वर्षाला सोमवारी सुरुवात झाली. यानिमित्त कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पहिल्याच दिवशी विद्यापीठ, उपकेंद्रातील विभागप्रमुख, प्राध्यापकांची महात्मा फुले सभागृहात बैठक घेतली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांची उपस्थिती हाेती. कुलगुरू म्हणाले, विद्यापीठातील प्रत्येक प्राध्यापकांचे पदोन्नतीसह इतर विषय मार्गी लावले आहेत. त्यामुळे प्राध्यापकांनी शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी काम करावे. प्रशासन विभागात ‘स्मार्ट क्लासरूम’ तयार करून देणार आहे. यापुढे तासिका होत नाहीत. वेळेवर निकाल लागत नाहीत. प्राध्यापक गैरहजर राहतात, या गोष्टी खपवून घेणार नाही. त्यासाठीच प्राध्यापकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांची ७५ टक्के उपस्थिती नसेल तर संबंधितास परीक्षा अर्जच भरता येणार नाही.

२०२७ मध्ये ‘क्यूएस रँकिंग’विद्यापीठ २०२७ मध्ये जागतिक पातळीवर गुणवत्ता तपासणाऱ्या ‘क्यूएस रँकिंग’ला सामोरे जाणार आहे. त्यासाठी प्राध्यापकांना प्रत्येक वर्षी दोन संशोधन प्रकल्प व पाच शोधनिबंध प्रकाशित करणे गरजेचे आहे.

‘त्या’ प्राध्यापकांची नावे कुलगुरूंकडेविद्यापीठातील अनेक विभागांत काही विशिष्ट प्राध्यापक वेळेवर येत नाहीत. विभागात आल्यानंतर तासिकांवर जात नाहीत. गेले तरी उशिरा जातात व लवकर निघून येतात. काही जण स्वत:कडे पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना वर्गावर पाठवितात. तसेच विद्यार्थी कमी असल्यामुळे केबिनमध्येच बोलावून तास घेतात, अशा प्राध्यापकांची यादीच कुलगुरूंकडे पोहोचल्याचे समजते. त्यामुळे कुलगुरू कोणत्याही वेळी संबंधित प्राध्यापकांच्या वर्गांना अचानक भेटी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र