नांदेड : जिल्ह्यात बिलोली तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९३़७३ टक्के लागला आहे़ तर सर्वात कमी ८१़६० टक्के निकाल देगलूर तालुक्याचा लागला आहे़ जिल्ह्यात बिलोलीसह हदगाव, माहूर, हिमायतनगर आणि अर्धापूर तालुक्याचा निकाल हा ९३ टक्के लागला आहे़ बिलोली तालुक्यातील ८६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ त्यातील ८०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ हदगाव तालुक्याचा ९३़५५ टक्के निकाल लागला़ तालुक्यातील १ हजार १४८ पैकी १ हजार ७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ त्याखालोखाल ९३़३७ टक्के निकाल हा माहूरचा असून ४६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ ४९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ हिमायतनगरचा निकाल हा ९३़२९ टक्के आहे़ ४४७ विद्यार्थ्यांपैकी ४१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ तर अर्धापूर ९३़१० टक्के लागला़ ४३५ विद्यार्थ्यापैकी ४०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ मुदखेड तालुक्याचा निकाल हा ९२़१ टक्के लागला़ ४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे़ एकूण परीक्षार्थ्यांची संख्या ५३८ होती़ नांदेड तालुक्याचा निकाल हा ९१़७९ टक्के आहे़ तालुक्यातील ७ हजार ६९५ पैकी ७ हजार ६३ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे़ नायगाव तालुक्याचा निकाल ९१़७९ टक्के लागला आहे़ १ हजार ५५७ पैकी १४२६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले़ भोकर तालुक्यातील ७७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ भोकर तालुक्याचा निकाल हा ९१़०७ टक्के आहे़ मुखेड तालुक्याचा ९०़८५ टक्के निकाल लागला आहे़ तालुक्यातील १ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून १ हजार ९७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ लोहा तालुक्यातील १ हजार १५५ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ तालुक्याचा एकूण निकाल हा ९०़८५ टक्के आहे़ किनवट तालुक्याचा एकूण निकाल हा ८९़८५ टक्के लागला आहे़ तालुक्यातून १ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ त्यातील १ हजार ६२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ कंधार तालुक्यात २ हजार १९२ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे़ तालुक्यातून २ हजार ४ ७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ कंधार तालुक्याचा निकाल हा ८८़६४ टक्के निकाल आहे़ उमरी तालुक्याचा निकाल हा ८७़६१ टक्के आहे़ तालुक्यातील ५७३ विद्यार्थ्यांपैकी ५०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ धर्माबाद तालुक्याचा निकाल ८६़३३ टक्के लागला आहे़ त्यात ६७३ विद्यार्थ्यांपैकी ५८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ तर देगलूर तालुक्यातील १ हजार ७९३ पैकी १ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ तालुक्याचा एकूण निकाल हा ९१़६० टक्के आहे़ (प्रतिनिधी)
जिल्ह्यात निकालाच्या टक्केवारीत बिलोली अव्वल
By admin | Updated: June 3, 2014 00:42 IST