श्रीनिवास भोसले, नांदेडवृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे़़पक्षी ही सुस्वरे आळविती़़़या रचनेतून संत तुकाराम महाराज यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व शेकडो वर्षांपूर्वी सांगितले़ मात्र वैयक्तिक हव्यासापोटी मौल्यवान वनसंपदा नष्ट होण्यास आपण कारणीभूत ठरत आहोत़ पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज बनली आहे़ वृक्षसंवर्धनासाठी राज्यात बिहार पॅटर्न राबविला जात आहे़ सजीव जीवनावर विपरीत परिणाम करणारे घटक शोषून घेत शुद्ध वायू निर्मितीचे कार्य वृक्ष करतात़ समृद्ध वनसंपदेतून अनेक औषधी वनस्पती तसेच इंधन मिळते़ मात्र स्वत:चा आर्थिक लाभ व वाढते नागरिकीरणाची समस्या सोडवण्यासाठी झाडांची कटाई केली जाते़ यामुळे पावसात अनियमितता, पर्यावरणाचा ऱ्हास आदी गंभीर समस्या उद्भवत आहेत़ यावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र व राज्य शासनासह सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी अहोरात्र प्रयत्न करत आहेत़ सामाजिक वनिकरण विभागातर्फे विशेष योजना राबविल्या जातात़ वृक्षारोपण मोहीम व्यापक स्वरुपात राबविण्यासाठी शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, शासकीय कार्यालयांना मोफत रोपे दिली जात आहेत़ महराष्ट्रातही वृक्षसंवर्धनाचा बिहार पॅटर्नवनराई समृद्ध होण्यासाठी बिहार राज्यात वृक्ष संगोपनाची जबाबदारी एका कुटुंबावर देवून प्रत्येक कुटुंबास दोनशे रोपांचे संगोपन करण्यासाठी महिन्याला चार हजार रुपये दिले जातात़ याच धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना राबविण्यात येत आहे़ जिल्ह्यात १ हजार कुटुंंबावर वृक्ष संगोपनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ यामध्ये ज्येष्ठ नागरिक,महिलांना प्राधान्य दिले आहे़ जिल्ह्यातील जंगलामध्ये अनेक औषधी वनस्पतीजिल्हात वनराईने समृद्ध असून सागवान, मोह, निलगिरी, शिसम, करंज, सीताफळ, आवळा, धावडा, लेंडी, साल, अंजन यासह विविध औषधी वनस्पती किनवट, माहूर, कंधार, लोहा आदी तालुक्यांत आढळून येतात़ वनविभागात समस्याच समस्यावनसंवर्धन व संरक्षणाचे काम वनविभागाला करावे लागते़ जिल्हास्तरावर उपवनसंरक्षक तर तालुकास्तरावर वनक्षेत्रपाल यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी कार्यरत असतात़ झाडांची कत्तल व तस्करी रोखण्याचे आव्हान या विभागावर आहे़ परंतु या विभागातील अनेक जागा रिक्त असल्याने आणि गस्तीसाठी वाहनांची वाणवा असल्याने त्यांना काम करणे कठीण होत आहे़ वनविभागाच्या पथकावर तस्करांकडून अनेकवेळा हल्ले होतात़ अशावेळी त्यांच्याकडे स्वरक्षणासाठी कोणतेही हत्यार उपलब्ध नसते़ जीव धोक्यात टाकून कर्तव्य बजावावे लागते़रस्त्याच्या दुतर्फा झाडे़़़रस्त्यावर वाहनाच्या माध्यमातून होणारे प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली जातात़ वनविभागाकडून यासाठी दरवर्षी खर्च केला जातो़ जिल्ह्यातील बहुतांश मुख्य रस्त्यावर नव्याने लावण्यात आलेली झाडे दिसत नाहीत़ जुनी आहेत ती झाडे राजरोसपणे तोडून नेण्याचा सपाटा लावला जातो़ याकडे संबंधित प्रशासन लक्ष देत नाही़ यामुळे आजघडीला जिल्ह्यातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेली झांडाची संख्या दिवसेंदिवस घटत आहे़ याकडे लक्ष देण्याची गरज आहे़ झाडांची कत्तल थांबवा़़़पक्षी निवासाची सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे वृक्ष़ आज सर्वत्र सिमेंटचे जंगल वाढत असल्याने पक्ष्यांच्या राहण्याचे ठिकाणेच धोक्यात आली आहेत़ आपल्या सभोवताल पक्षी असणे निसर्गातील पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून झाडाची कत्तल थांबवविणे गरजेचे आहे़ जंगलाचा ऱ्हास़़़आज तीव्र गतीने जंगलतोड होत असल्यामुळे जैवविविधता हळूहळू नष्ट होत आहे़ जंगलाचा होणारा ऱ्हास संपला नाही तर त्याचे दुष्परिणाम मानवालाच भोगावे लागणार आहेत़ जिल्ह्यातील जंगलात होणारी वृक्षतोड पर्यावरणाचा समतोल बिघडण्यास कारणीभूत ठरू शकते़इंधन म्हणून उपयोग़़़ इंधन तसेच मोकळी जमीन तयार करण्यासाठी झाडांची होणारी कत्तल थांबविण्यास सर्र्वांनी पुढाकार घ्यावा़जिल्ह्याचे वनक्षेत्रजिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६ हजार ५२ चौरस किलोमीटर आहे़ जिल्ह्यातील १ हजार २९९ चौरस किलोमीटर वनक्षेत्रापैकी १ लाख ८ हजार २४० हेक्टर राखीव वनक्षेत्र आहे. किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर तालुक्यात वनविभागाचे सर्वाधिक क्षेत्र आहे़ माहूर तालुक्यात १३ हजार ४७४ हेक्टरवर वनक्षेत्र आहे़ तर किनवट तालुक्यात ६७ हजार १२६ हेक्टर वनक्षेत्र असून मांडवी, इस्लापूर, बोधडी आदी भागात सागवानी जंगल आहे़ शतकोटी योजनेअंतर्गत गतवर्षी लावण्यात आलेल्या रोपांपैकी जवळपास ९० टक्के रोपटे जगली असल्याचा अहवाल आहे़पावसाळ्यात शेतातील सुपीक माती वाहून जात असल्याने जमीन खडकाळ व नापीक बनते़
वृक्षसंवर्धनाचा बिहार पॅटर्ऩ़़
By admin | Updated: July 23, 2014 00:24 IST