शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅफिकसाठी मोठा तोडगा; शेंद्रा-बिडकीन-वाळूज इंडस्ट्रील बेल्ट एकत्रीकरणासाठी बायपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 20:14 IST

शेंद्रा-बिडकीन बायपास रस्ता हा ३५ कि.मी लांबीचा असून, हा प्रस्ताव २०१७ पासून चर्चेत आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहराचा वाढता विस्तार व येऊ घातलेले नवे उद्योग पाहता शहराच्या रहदारीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शेंद्रा- बिडकीन बायपास रस्त्याच्या तयार केलेल्या प्रस्तावात रस्ता जोडणीच्या नव्या सूचनांसह सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी संबंधित यंत्रणांना दिले. पुढे हाच रस्ता वाळूज उद्योगनगरीला जाऊन मिळेल.

शेंद्रा-बिडकीन बायपास रस्ता हा ३५ कि.मी लांबीचा असून, हा प्रस्ताव २०१७ पासून चर्चेत आहे. या प्रकल्पात धुळे-सोलापूर महामार्ग, समृद्धी महामार्ग, वाळूज औद्योगिक वसाहत, तसेच अहिल्यानगर, पुण्याकडे जाणारा रस्ता या सर्व रस्त्यांना प्रस्तावित मार्गाची जोडणी असणे आवश्यक आहे. या बाबींचा अंतर्भाव करून नवीन प्रकल्प अहवाल तयार करणे गरजेचे आहे. आगामी कालावधीत पूर्वेकडून जालना येथील ड्रायपोर्ट व पश्चिमेकडून वाढवण बंदर हे दोन प्रकल्प पूर्ण होताच या मार्गावरील रहदारीचे, मालवाहतुकीचे प्रमाण वाढेल. या मुद्यांचा विचार करून सुधारित प्रस्ताव सादर होईल.

शेंद्रा-बिडकीन बायपास या रस्त्याच्या कामासंदर्भात शुक्रवारी सावे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापक संघर्ष मेश्राम, अधीक्षक अभियंता अनिकेत कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सूर्यकांत गलांडे, ऑरिक सिटीचे उपमहाव्यवस्थापक शैलेश धाबरकर, प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे, सा.बां. वि.चे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, हिरासिंग ठाकूर आदी उपस्थित होते.

उद्योगांच्या अंतर्गत विकासाचा दुवाशेंद्रा, बिडकीन आणि वाळूज ही छत्रपती संभाजीनगरलगतची महत्त्वाची औद्योगिक केंद्रे आहेत. या ठिकाणी वाढती वाहतूक, औद्योगिक घनता आणि नागरीकरण लक्षात घेता, ‘बायपास मार्ग’ हा महत्त्वाचा पर्याय आहे. हा बायपास एक प्रकारे डीएमआयसी येणाऱ्या उद्योगांच्या अंतर्गत विकासाला मदत करणारा दुवा ठरेल.

जालना रोडला पर्यायशेंद्रा औद्योगिक वसाहतीला जाण्यासाठी सोलापूर-धुळे महामार्गाची कनेक्टिव्हिटी लांब आहे. त्यामुळे जालना रोडवर औद्योगिक वाहतुकीचा भार पडतो आहे. त्यामुळे शेंद्रा-बिडकीन-वाळूज इंडस्ट्री बेल्ट एकत्रीकरणासाठी बायपास गरजेचा आहे.

का आवश्यक आहे बायपास?शहरातील जालना रोडला पर्याय असेल. वाहतूक कोंडी कमी होईल.औद्योगिक वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग मिळेल.डीएमआयसीच्या दोन्ही नोड्सला गती मिळेल.भविष्यातील लॉजिस्टिक हब म्हणून निर्मिती

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMIDCएमआयडीसी