शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
2
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
3
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
4
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
5
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
6
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
7
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
8
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
9
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
10
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
11
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
12
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
14
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
15
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
16
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
17
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
18
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
19
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
20
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी! जायकवाडी धरणावर साकारणार १० हजार कोटींतून तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 18:40 IST

जायकवाडी धरणावर आता 'फ्लोटिंग पॉवर हाऊस'; १२% जलक्षेत्रातून होणार १३४२ मेगावॅट वीजनिर्मिती!

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणातील एकूण जलसाठवण क्षेत्रफळाच्या १२ टक्के पाण्याने व्यापलेल्या भागावर १० हजार कोटींच्या खर्चातून तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास राज्य शासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ व केंद्रीय वन व पर्यावरण, पाटंबधारे विभागाने मंजुरी दिल्याची माहिती खा. डॉ. भागवत कराड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. मराठवाड्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असून, शेती व उद्योगांना मोठा दिलासा मिळेल, शिवाय हरित वीजनिर्मितीमधील महत्त्वाचे पाऊल पडेल.

भारतातील सर्वांत मोठा फ्लोटिंग सोलार एनर्जी जनरेशनचा हा प्रकल्प असल्याचा दावा करीत कराड यांनी सांगितले, नॅशनल थर्मल पाॅवर काॅर्पोरेशन (एनटीपीसी) या प्रकल्पासाठी १० कोटींची गुंतवणूक करून १३४२ मेगावॅट वीजनिर्मिती करील. ही वीज उद्योग आणि शेतीसाठी स्वस्तात मिळण्यासाठी खरेदी करतानाच शासन व महावितरणमध्ये करार होईल. १ महिन्यात प्रकल्पाच्या कामासाठी भूमिपूजन होईल. २ वर्षांत प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. पर्यावरण मंत्रालयाने या प्रकल्पासाठी दीपक नाईक हे कन्सल्टंट नेमले आहेत. पत्रपरिषदेला बबन नरवडे, कचरू घोडके, दिलीप थोरात आदी उपस्थित होते.

पक्षी अभयारण्यास धोका नाहीजैविविधता आणि पक्षी अभयारण्यास कुठलाही धोका होणार नाही, असा दावा कराड यांनी केला. ३३ हजार ९८९ हेक्टरवर जायकवाडी धरण आहे. त्यातील ४ हजार २५२.९५ हेक्टरवर म्हणजेच १२ टक्के जलक्षेत्रावर तरंगता सोलार ऊर्जा प्रकल्प असेल. २८ टक्के बाष्पीभवन कमी होईल. धरणाच्या दक्षिण दिशेला २ व उत्तर दिशेला १ सोलार पॅनल असतील. ३ कि.मी. अंतरात इको सेन्सेटिव्ह झोन आहे. पाॅवर स्टेशनसाठी ३ ठिकाणी प्रत्येकी ४० एकर जमिनीचे हस्तांतरण झाले आहे. पाटबंधारे आणि एनटीपीसीची याला तत्त्वत: मंजुरी मिळाली.

मासेमारी करणाऱ्यांचे नुकसान नाहीमासेमारी करणाऱ्यांचे या प्रकल्पामुळे नुकसान होणार नाही. कारण फक्त १२ टक्के जलक्षेत्रावर प्रकल्प असेल. उर्वरित ८८ टक्के जलक्षेत्र मासेमारीसाठी मोकळे असेल. पाण्याचा प्रवाह सोडून असलेल्या क्षेत्रावर हा प्रकल्प असेल.

प्रकल्पाची तांत्रिक माहिती:कोणती संस्था प्रकल्प उभारणार : एनटीपीसीखर्च किती : १० हजार कोटीरोजगार निर्मिती : २००वीजनिर्मिती : १३४२ मेगावॅटफायदा काय? : २८ टक्के पाण्याचे बाष्प होणार नाही, शेती व उद्योगांना सवलतीत वीज मिळेल.किती वर्षे वीजनिर्मिती? : २५ वर्षे

English
हिंदी सारांश
Web Title : Massive floating solar project approved for Jayakwadi dam, Maharashtra.

Web Summary : Maharashtra approves ₹10,000 crore floating solar project on Jayakwadi dam. NTPC invests, generating 1342 MW, benefiting agriculture and industry with cheaper power. Project completion in 2 years.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरJayakwadi Damजायकवाडी धरणelectricityवीज