शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मोठी बातमी! हर्षवर्धन जाधव यांचा के. चंद्रशेखर राव यांच्या BRS मध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 18:11 IST

काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन जाधव यांनी पुढील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ( उबाठा) नेते चंद्रकांत खैरे यांनी पाठिंबा जाहीर केला होता.

छत्रपती संभाजीनगर: कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बीआएस अर्थात भारत राष्ट्र समिती या तेलंगणाच्या सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्याचे सोशल मिडीयावर आज सकाळी जाहीर केले. मागील लोकसभा निवडणुकीत जाधव यांनी घेतलेल्या मतांनी उलटफेर घडत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव होते एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले होते. यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाधव यांचा नव्या पक्षातील प्रवेश उत्सुकता वाढवणारा आहे. 

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सत्ताधारी पक्ष बीआरएसने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. नांदेडमध्ये सभा घेतल्यानंतर राव यांनी पक्षवाढीसाठी सर्व पर्याय खुले असल्याचे जाहीर केले होते. आजीमाजी खासदार, आमदारांना बीआरएसमध्ये येण्याचे निमंत्रण पक्षप्रमुखांनी दिले आहे. मागील आठवड्यातच शहरात आयोजित सोहळ्यात अनेकांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आज कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले. सोशल मीडियात एका व्हिडिओच्या माध्यमातून जाधव यांनी पक्ष प्रवेश केल्याचे जाहीर केले. तेलंगणात शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. हा बदल करण्यासाठी महाराष्ट्रातील सत्ता घेणाऱ्या के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाकडे देण्यात यावी. यासाठी काम करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे सभा होणार असल्याची माहिती आहे. या सभेत देखील अनेकजण बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत.

हर्षवर्धन जाधव कायम चर्चेत राहणारे व्यक्तिमत्वकन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव, खाजगी आयुष्यातील चढउतार यामुळे जाधव सक्रीय राजकारणापासून दूर होते. काही दिवसांपूर्वीच जाधव यांनी पुढील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ( उबाठा) नेते चंद्रकांत खैरे यांनी पाठिंबा जाहीर केला होता. माझ्या पाठींब्यावर खैरे पुढील खासदार असतील असेही ते म्हणाले होते. दरम्यान, जाधव यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्यातील आगामी निवडणुकीत रंगत वाढणार आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव