शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
4
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
5
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
6
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
7
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
8
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
9
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
10
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
11
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
12
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
13
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
14
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
15
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
16
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
17
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
18
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
19
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
20
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार

ठाकरेंची मोठी खेळी; भूमरेंच्या कट्टर विरोधकास घेतले पक्षात, मातोश्रीवर बांधले शिवबंधन

By बापू सोळुंके | Updated: February 6, 2024 18:03 IST

दत्ता गोर्डे यांना पक्षप्रवेश देऊन ठाकरेंकडून पालकमंत्र्यांना शह देण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर: पैठण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा  शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा विविध पक्षांचा प्रवासी राहिलेले दत्ता गोर्डे यांनी आज मुंबईत जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.  गोर्डे यांना पक्षात घेऊन शिवसेनेने जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना शह देण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.

गोर्डेहे मूळचे शिवसेनेचे होते. ते उघडपणे भुमरे यांच्याविरोधात भूमिका घेत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर शिवसेनेतून त्यांची हाकलपट्टी करण्यात आली होती. यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर गोर्डे यांनी  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आणि  सन २०१९ची पैठण विधानसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढविली. या निवडणूकीत भुमरे यांनी त्यांचा १५ हजार मतांनी पराभव केला होता.  

गोर्डे यांनी आज मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेल्या गोर्डें यांच्या  घरवापसीमुळे अजित पवार गटाला पैठण मध्ये मोठा धक्का बसला आहे.  त्यांच्यासोबत आज माजी सभापती, सुरेश दुबाळे ,प्रा. वि.आर.थोटे , माजी उपाध्यक्ष आपासाहेब गायकवाड, प्रवीण शिंदे आदी जणांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.  

हा पक्षप्रवेश घडवून आणण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ.अंबादास दानवे यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. यासोबतच वैजापूर येथील वैद्यकीय व्यवसायिक डॉ. राजू डोंगरे व संभाजी नगर पूर्वमधील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉ. शोएब हाश्मी यांनीही आज शिवबंधन बांधले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबादAmbadas Danweyअंबादास दानवे