शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

सरकार आल्यास गारपीटग्रस्तांना मोठी मदत

By admin | Updated: May 12, 2014 00:07 IST

तुळजापूर : गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे झालेच नाहीत. जे झाले आहेत ते बहुतांश राजकीय शेतकर्‍यांचे झाले आहेत. गारपीटग्रस्तांचे खरे पंचनामे होणे गरजेचे आहे.

तुळजापूर : गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे झालेच नाहीत. जे झाले आहेत ते बहुतांश राजकीय शेतकर्‍यांचे झाले आहेत. गारपीटग्रस्तांचे खरे पंचनामे होणे गरजेचे आहे. मदतीसाठी १० हजार कोटी रुपयांची आवश्यकता असताना राज्याने फक्त नऊशे कोटी रुपये देऊन गारपीटग्रस्तांची थट्टा केल्याचे सांगतानाच एनडीएचे सरकार येताच केंद्राकडून राज्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मोठी आर्थिक मदत दिली जाईल, अशी ग्वाही भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिली. गोपीनाथ मुंडे यांनी रविवारी सपत्नीक तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले़ त्यानंतर प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर व जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी मुंडे यांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्यासमवेत जावई अमित पालवे, गौरव खाडे उपस्थित होते. राज्यात दलित अत्याचारात वाढ झाली आहे. मागील आठ दिवसातच दलित अत्याचाराच्या ३० घटना घडल्याचे सांगत, राज्यात काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात १६५० दलित अत्याचाराच्या घटना घडल्याची माहिती मुंडे यांनी दिली. अत्याचारातील आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण वाढले असल्याचे सांगत, यावरुन सरकार गुन्हेगारास शिक्षा देण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येते, असा आरोपही मुंडे यांनी यावेळी बोलताना केला. राज्यात कायद्याचा वचक राहिला नसल्याने रॉकेल, वाळू माफिया यांचे वर्चस्व निर्माण झाले असल्याचे सांगत सर्वसामान्य जनतेबरोबर कर्मचारी, अधिकारीही या राज्यात सुरक्षित नसल्याचे ते म्हणाले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. अनिल काळे, माजी जिल्हाध्यक्ष खंडेराव चौरे, उस्मानाबादचे माजी नगरसेवक धनंजय शिंगाडे, संजय निंबाळकर यांच्यासह विजय शिंगाडे, गुलचंद व्यवहारे, सुहास साळुंके, विकास मलबा, महानंदा पैलवान, दत्ता राजमाने, प्रभाकर मुळे, सचिन रसाळ, बाळा शामराज, श्रीकांत हिरोळीकर, उमेश गवते, विपीन शिंदे आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर) मराठवाड्यातील आठही जागा जिंकू-मुंडे लोकसभा निवडणुकीत एनडीए ला स्पष्ट बहुमत मिळणार असून, नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान हातील असा विश्वासही मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपाला २३० ते २४० जागा मिळतील तर महाराष्ट्रात महायुतीस ३२ ते ३५ जागा मिळण्याची शक्यता असून, मराठवाड्यातील आठही जागा महायुती जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.