शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या प्रस्तावाची प्रतीक्षाच; छ. संभाजीनगरात इच्छुकांनी अर्ज भरण्याचे शिंदेसेनेचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:28 IST

छत्रपती संभाजीनगरात मोठी घडामोड; भाजपच्या नवीन प्रस्तावाची प्रतीक्षा शिंदेसेनेला होती. परंतु रात्री उशिरापर्यंत भाजपने प्रस्ताव दिलाच नाही.

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरलेले असताना भाजपशी युतीची सुरू असलेली चर्चा संपत नसल्यामुळे शिंदेसेनेने इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश रविवारी मध्यरात्री दिल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

रविवारी दिवसभर भाजपच्या नवीन प्रस्तावाची प्रतीक्षा शिंदेसेनेला होती. परंतु रात्री उशिरापर्यंत भाजपने प्रस्ताव दिलाच नाही. त्यामुळे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रात्री उशिरा त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटी सदस्यांची बैठक बोलावली. त्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.

भाजप- शिंदेसेनेत जागा वाटपावर एकमत झालेले नाही. कालपर्यंत नऊ बैठका झाल्या. परंतु, १२ जागांवर तोडगा निघाला नव्हता. सुधारित प्रस्ताव घेऊन येतो, असे भाजपने सांगितले असलेतरी उशीरापर्यंत शिंदेसेनेला असा कुठलाही प्रस्ताव मिळाला नव्हता.

शिंदेसेना ४१ जागा लढण्यावर ठाम आहे. तर भाजपने शिंदेसेनेला ३३ जागा देण्यास तयारी दर्शवली. शेवटी युतीच्या निर्णयाचा चेंडू वरिष्ठांकडे गेला. सुधारित प्रस्ताव घेऊन आम्ही येतो, असा निरोप भाजपने शिंदेसेनेला दिला होता. भाजपच्या नवीन प्रस्तावावर वाटाघाटी करण्यासाठी शिंदेसेनेची मुख्य समन्वय समिती दिवसभर त्यांच्या प्रस्तावाची प्रतीक्षा करीत होती.

कोणत्या प्रभागांवरून वाददोन्ही पक्षांचे प्रभाग क्रमांक २२ आणि २७ मध्ये एकमत होऊ शकले नाही. प्रभाग क्रमांक २२ मधून शिंदेसेनेचा पदाधिकारी व प्रभाग क्रमांक २७ मधून भाजपमधील नवीन इच्छुक आहेत. तसेच मध्य शहरातील प्रभाग क्रमांक १ आणि १७ वरूनही उभय पक्षांत वाद सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काही लढती मैत्रीपूर्ण शक्यकाही ठिकाणी महायुतीमध्ये, तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. त्यामुळे जागा वाटपाचा निर्णय रविवारी शक्य झाला नाही. भाजप वरिष्ठांना पाठवलेला मसुदा अद्याप अंतिम झालेला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांची रविवारी संयुक्त बैठक झाली नाही.- अतुल सावे, ओबीसी कल्याण मंत्री

प्रस्तावाची वाट पाहतोयभाजपकडून आज आम्हाला सुधारित प्रस्ताव येणार होता. मात्र, रात्री ९ वाजले तरी त्यांच्या अंतर्गत बैठका सुरूच असल्याचे समजले. त्यांच्याकडून नवीन प्रस्तावच न आल्याने रविवारी उशिरापर्यंत आमची त्यांच्यासोबत चर्चा झाली नाही. १२ जागांवर आमचे एकमत होऊ शकले नाही. तेथे किमान मैत्रीपूर्ण लढत असा प्रस्ताव आला तर त्यावर आम्ही विचार करू.- संजय शिरसाट, पालकमंत्री तथा शिंदेसेना नेते.

English
हिंदी सारांश
Web Title : Aurangabad: Shinde's Shiv Sena Orders Applicants to File Nomination Midnight.

Web Summary : With BJP alliance talks stalled, Shinde's Shiv Sena ordered hopefuls to file nomination forms. Disagreement over seat sharing persists, leading to potential friendly contests. Discussions are ongoing.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा