शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

मोठा निर्णय! MIDC चे ' रतन टाटा स्किल डेव्हलपमेंट सेंटर' छत्रपती संभाजीनगरमध्ये

By बापू सोळुंके | Updated: September 26, 2025 12:42 IST

हे सेंटर पाच वर्षांसाठी एका संस्थेला चालविण्यास देण्यात आले आहे. सुमारे ७ हजार विद्यार्थी यात शिकतील.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक विविध नामांकित कंपन्यांनी केली आहे. आणखी बऱ्याच कंपन्या येण्यास उत्सुक आहेत. या उद्योगांना आवश्यक ते कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी एमआयडीसी छत्रपती संभाजीनगरमध्ये रतन टाटा स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी रात्री ११:३० वाजता पत्रकार परिषदेत केली.

मराठवाड्यात अतिवृष्टीने उद्योगांचे व शेतीचे नुकसान झाल्याची माहिती मिळाल्यानंतर उद्योगमंत्र्यांनी गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. आ. विलास भुमरे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, एमआयडीसीचे मुख्य अभियंता बाळासाहेब झांजे, कार्यकारी अभियंता आर.डी. गिरी, ऑरिक सिटीचे अरुणकुमार दुबे, सीएमआयएचे अध्यक्ष उत्सव माछर आणि पदाधिकारी, मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड, राहुल मोगले, मनीष अग्रवाल, राजेंद्र चौधरी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आढावा बैठकीनंतर त्यांनी लोकमत प्रतिनिधीशी संवाद साधला. ते म्हणाले की, येणाऱ्या मोठ्या उद्योगांना आवश्यक ते कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी एमआयडीसीकडून कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत आहे. याला रतन टाटा यांचे नाव देण्यात येत आहे. हे सेंटर पाच वर्षांसाठी एका संस्थेला चालविण्यास देण्यात आले आहे. सुमारे ७ हजार विद्यार्थी यात शिकतील.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीअतिवृष्टीमुळे औद्योगिक वसाहतीच्या संलग्न भागात गावात, शेतात पाणी शिरल्याचे प्रकार घडले. ते भविष्यात घडू नयेत, यासाठी तात्काळ उपाययोजना राबवा. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करा, असे निर्देश सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले.

उद्याेगमंत्री आज करणार नुकसानीची पाहणीशुक्रवारी आपण नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करणार आहोत. शिवाय शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील अनेक ठिकाणच्या उद्योगांचे नुकसान झाले आहे. शिवाय एमआयडीसीतील रस्ते खराब झाले, याचा आढावा घेतल्याचे ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratan Tata Skill Development Center to be established in Sambhajinagar!

Web Summary : MIDC will establish a Ratan Tata Skill Development Center in Sambhajinagar to provide skilled manpower for industries. The center will train 7,000 students over five years. Minister Uday Samant announced this after reviewing rain damage and assuring support to farmers.
टॅग्स :MIDCएमआयडीसीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढा