शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भोपाळमध्ये हिंदीचे स्वतंत्र विश्वविद्यालय आहे, महाराष्ट्रात मराठीचे स्वतंत्र विद्यापीठ आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 12:07 IST

केंद्रीय पर्यावरण व कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी डॉ. सुधीर रसाळ यांना केली विचारणा

छत्रपती संभाजीनगर : भोपाळमध्ये हिंदीचे स्वतंत्र विश्वविद्यालय आहे, तसे महाराष्ट्रात मराठीचे स्वतंत्र विद्यापीठ आहे का? असा रोकडा सवाल केंद्रीय पर्यावरण व कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रख्यात साहित्यिक व समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना विचारला. मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंत्री भूपेंद्र यादव शनिवारी शहरात मुक्कामी असताना त्यांनी डॉ. रसाळ यांची सदिच्छा भेट घेतली. डॉ. रसाळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी सुमारे ४० मिनिटे चर्चा केली. ही चर्चा निखळ साहित्यावर होती. सर्व प्रादेशिक भाषांची होणारी अधोगती, निर्माण होणाऱ्या साहित्याचा सध्याचा प्रवाह यावर चांगलीच चर्चा रंगली. तेव्हा अचानक त्यांनी मराठी भाषा विद्यापीठाचा मुद्दा उपस्थित केला. मराठी भाषेचे जतन, संवर्धन व्हायचे असेल तर विद्यापीठ आवश्यक आहे, यावर दोघांचे एकमत झाले.

तामिळ, मल्याळम भाषेत विपुल साहित्य निर्मिती होते. सर्व प्रादेशिक भाषेत तसाच प्रवाह आला पाहिजे. तामिळनाडूत मठामध्ये तामिळ भाषेतून संस्कार आजही नेटाने होतात. त्यातूनच त्या भाषेत साहित्य निर्मितीस चालना मिळते. सर्व शिक्षण स्थानिक भाषेतून झाले पाहिजे, या मुद्द्यावर डॉ. रसाळांनी भर दिला. हवे तर इंग्रजीतील शब्दांचा प्रयोग तसाच करा. उदाहरणार्थ ॲाक्सिजन शब्द तसाच वापरा. युरोप, जपान, कोरिया, जर्मनी, चीन आदी देशांत पूर्ण शिक्षण त्यांच्या भाषेतच आहे. तरीही त्यांच्या प्रगतीत कुठेही अडथळा नाही, मग आपणच का इंग्रजीचे स्तोम माजवतो? असेही ते म्हणाले. यावेळी यादव यांच्या सोबत आ. प्रशांत बंब, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, विजय औताडे, हर्षवर्धन कराड आणि रसाळ कुुटुंबीयांतील वंदना रसाळ, हेमंत मिरखेलकर, अर्चना अकोलकर, सानिका अकोलकर आदींची उपस्थिती होती.

भेट संस्मरणीय माझा मुलगा अमेरिकेतील उत्तम नोकरी सोडून भारतात आला व त्याने छत्रपती संभाजीनगरात राहून स्टार्टअप इंडिया अंतर्गत आयटी कंपनी स्थापन केली. ही माहिती मी सांगितल्यावर मंत्री महोदयांनी आनंद व्यक्त केलाच; पण त्याच्याशी बोलून तो नेमके काय करतो, ही माहिती घेतली. निखळ आनंदाची ही भेट संस्मरणीय तर झालीच; पण औचित्यपूर्ण चर्चेने रंगत आणली. कुठलाही बडेजाव नाही. वायफळ चर्चा नाही. हा अनुभव सुखद होता, अशी बापूंची प्रतिक्रिया होती. ही चर्चा ऐकताना त्यात भाग घेताना मनस्वी आनंद झाला.-हेमंत मिरखेलकर, उद्योजक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmarathiमराठीhindiहिंदीuniversityविद्यापीठ