शहरं
Join us  
Trending Stories
1
"जब-जब जुल्म, तब-तब जिहाद", महमूद मदानी यांच्या वादग्रस्त विधानावर भाजप म्हणाला 'व्हाईट कॉलर दहशतवाद'; काँग्रेसचीही प्रतिक्रिया
2
डोनाल्ड ट्रम्प यांची 5000 KM दूर असलेल्या देशावर हल्ल्याची तयारी, केव्हाही होऊ शकतो हल्ला? एअरस्पेस बंदची घोषणा
3
लग्नात काही जण मुलींसमोर अश्लील भाषेत बोलत होते; विरोध केला म्हणून नॅशनल प्लेयरची बेदम मारहाण करत हत्या
4
"शिवसेना को हराना मुश्किल ही नही, नामुमकिन है"; बदलापूरच्या सभेत एकनाथ शिंदेंचा एल्गार 
5
भूक लागली, जेवण वाढ; 'हाताने घेऊन खा' म्हणताच कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीची हत्या
6
Video : काळ्या समुद्रात दोन रशियन 'शॅडो फ्लीट' टँकरवर मोठा ड्रोन हल्ला, क्रू मेंबर्सची आरडाओरड; 'या' देशानं घेतली जबाबदारी
7
"मी कन्व्हर्टेड मुस्लीम.. " कंट्रोल रूमला कॉल करून अमरावती पोलिस आयुक्तालयात दिल्लीसारख्या बाॅम्बस्फोटाची धमकी
8
विराटने कसोटी निवृत्ती मागे घेण्याची होतेय मागणी; ...तर ठरेल '21व्या शतकातील' सर्वात मोठा कमबॅक!
9
Travel : काश्मीर ट्रीपच्या बजेटमध्ये आरामात फिरू शकता 'हा' देश; ५ दिवसांत मनसोक्त करता येईल भटकंती!
10
पाकिस्तानला थेट इशारा देत तालिबानने 'स्पेशल फोर्स' केली तयार;  सीमेवरील परिस्थिती चिघळणार?
11
आता 'या' देशात सोशल मीडियावर बंदी येणार? कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का!
12
Video - लग्नात चिप्स, स्नॅक्सवर तुटून पडले पाहुणे; चेंगराचेंगरीत चिमुकलीवर सांडला उकळता चहा
13
पाकिस्तानातील घटनादुरुस्तीने 'हुकूमशहा' बनला आसिम मुनीर! सत्ता अनियंत्रित, UN ने दिला स्पष्ट इशारा
14
"या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेही नाही..."; भर पत्रकार परिषदेत कर्णधार KL राहुल झाला निरुत्तर
15
Video : ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी ६२व्या वर्षी बांधली दुसरी लग्नगाठ; जोडी हेडन बनल्या 'फर्स्ट लेडी'!
16
दूध, बटर, ज्यूस... 'या' गोष्टी फ्रिजच्या डोअरमध्ये ठेवण्याची करू नका चूक, नाहीतर होईल नुकसान
17
बाबो! ना पडला, ना लागलं... AI ने जखम दाखवून कर्मचाऱ्याने घेतली सुटी, HR ला काढलं वेड्यात
18
टाटा सिएराचे सर्वात मोठे 'प्रतिस्पर्धक', किती आहे क्रेटा आन् सेल्टॉसची किंमत? कोणती कार सर्वात दमदार? जाणून घ्या 
19
टेक्नॉलॉजिया! कपड्यांप्रमाणे आता माणसांचीही 'धुलाई' होणार; 'या' देशाने आणली जगातली पहिली 'ह्युमन वॉशिंग मशीन' 
20
IND vs SA: रोहितसोबत ओपनर कोण? किपिंग कोण करणार? कर्णधार केएल राहुलने सगळ्यांची उत्तरं दिली
Daily Top 2Weekly Top 5

भोकरला पाच दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 23:27 IST

विठ्ठल फुलारी, भोकर तालुक्यासह भोकर शहरातही तीव्र पाणीटंचाई सुरू झाली असून शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या सुधा प्रकल्पात १५ टक्के तर धानोरा तलावात १ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़

विठ्ठल फुलारी, भोकर तालुक्यासह भोकर शहरातही तीव्र पाणीटंचाई सुरू झाली असून शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या सुधा प्रकल्पात १५ टक्के तर धानोरा तलावात १ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ यामुळे शहरात आता पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असून शहरातील जुने सर्वच बोअर सुरु करण्यात येणार आहेत़तालुक्यात भीषण पाणीटंचाई सुरू झाली आहे़ अनेक गावांतील अधिग्रहण केलेले बोअरही आता बंद पडत आहेत़ जनावरांचा पाणीप्रश्नही गंभीर झाला असून सहा तलाव कोरडे पडले आहेत़ ग्रामीण भागासह आता शहरातही पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे़ शहरासाठी पाणीपुरवठा होणाऱ्या सुधा प्रकल्पात १५ टक्के पाणीसाठा असून धानोरा तलावात केवळ १ टक्के साठा उपलब्ध आहे़धानोरा तलाव लवकरच तळ गाठणार असल्याने भोकर शहराची सर्व भिस्त सुधा प्रकल्पावर राहणार आहे़ आजघडीला शहरात पाच दिवसआड पाणीपुरवठा होत असल्याने हे पाणी नागरिकांना अपुरे पडत आहे़ अनेक गरीब कुटुंबांकडे मोठ्या प्रमाणात पाणीसाठवण करण्यासाठी सुविधा नसल्याने पाच दिवसाआड येणारे पाणी दोन दिवसांत संपत असून नागरिकांना पुन्हा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़या पाणीपुरवठा योजनेला शहरातील ६० बोअरला आधार देवून नगर परिषद पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे़ शहरात ग्रामपंचायत काळातील व त्यानंतर घेतलेले २०० बोअर आहेत़ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्याने हे बोअर बंद करण्यात आले होते़ पण सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता पुन्हा हे सर्वच बोअर चालू करण्यात येणार आहेत़; पण पाणीपातळी घटत चालल्याने यातील किती बोअर चालतील हे पहावे लागणार आहे़ पाणीपुरवठा योजनेवर होणारा खर्च व आता नव्याने बोअरवर आगाऊ खर्च नगर परिषदेला सहन करावा लागणार आहे़ विशेष म्हणजे, शहरातील बहुतांश बोअरच्या पाण्यात फ्लोरासीसचे प्रमाण जास्त असल्याने हे पाणी पिण्यास कितपत योग्य आहे? असाही प्रश्न उपस्थित होत असून शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे़