शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

भीमाचा किल्ला, बीड जिल्हा..!

By admin | Updated: April 15, 2017 00:13 IST

बीड : अमाप उत्साहात शुक्रवारी जिल्ह्यात घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली.

बीड : ‘एकच साहेब .. बाबासाहेब..!, ‘भीमाचा किल्ला- बीड जिल्हा’ असा जयघोष... ढोल ताशांचा गजर... भीमगीतांवर थिरकणारी पावले... अशा अमाप उत्साहात शुक्रवारी जिल्ह्यात घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रम पार पडले. यावेळी निळा जनसागर लोटला होता.शुक्रवारी सकाळी सात वाजता भारतीय बौद्ध महासभेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून रॅलीला प्रारंभ झाला. प्रमुख मार्गावरुन निघालेली ही रॅली डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दाखल झाली तेथे भदंत शिवली बोधी यांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण झाले. त्रिशरण व पंचशील ग्रहण केल्यानंतर अभिवादन कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक गणेश गावडे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, माजी आ. राजेंद्र जगताप, रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, जि.प. सदस्य संदीप क्षीरसागर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे डॉ. जितेंद्र ओव्हाळ, अजिंक्य चांदणे, प्रा. प्रदीप रोडे, अशोक तांगडे, तत्वशील कांबळे, विकास जोगदंड, राहुल वाघमारे, राजू जोगदंड, मनीषा तोकले, अजय सवई, मुकुंद धुताडमल, बबन वाघमारे, अशोक वाघमारे, माणिक वाघमारे, तसेच सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी लहान मुले, महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. आबाल वृद्धांच्या गर्दीचे रुपांतर अक्षरश: जनसागरात झाले. विविध पक्ष, संघटना, मित्रमंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जयभीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. रथाच्या रोषणाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी ‘कसा शोभला असता भीम नोटावर’, ‘लई मजबूत भीमाचा किल्ला’ आदी भीमगीतांवर तरुणाई थिरकली. बच्चेकंपनींसह वृद्धांंनाही ढोल ताशाच्या गजरावर ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही.