शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

भारत बटालियनने सार्थ ठरवले ‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे ब्रीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:04 IST

औरंगाबाद : समाजकंटकांशी रस्त्यावर दोन हात करणारे भारत बटालियनचे जवान, कोरोनाची साथ रोखण्यासाठीही रस्त्यावर महिनोन‌्महिने उभे ठाकले अन‌् त्यातील ...

औरंगाबाद : समाजकंटकांशी रस्त्यावर दोन हात करणारे भारत बटालियनचे जवान, कोरोनाची साथ रोखण्यासाठीही रस्त्यावर महिनोन‌्महिने उभे ठाकले अन‌् त्यातील अर्धेअधिक जवान कोरोनाग्रस्तही झाले. पण या बहाद्दरांनी कोरोनालाही चारीमुंड्या चीत केले. या बटालियनने बुधवारी सामाजिक दायित्व निभावतांना उत्स्फूर्त रक्तदान करून, ‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे पोलीस दलाचे ब्रीद सार्थ ठरविले.

लोकमतचे संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान पंधरवड्यात बुधवारी सातारा परिसरातील भारत बटालियनमध्ये झालेल्या शिबिरात ८६ जवानांनी उत्स्फूर्त रक्तदान केले.

कोविड संसर्गामुळे रखडलेल्या शस्त्रक्रिया दीड वर्षांनंतर पुन्हा सुरू झाल्या. पण राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने लोकमत समूहाने राज्यभरात ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा उपक्रम हाती घेतला. भारत बटालियनचे समादेशक मधुकर सातपुते यांनी रक्तदान करून शिबिराचे औपचारिक उद्‌घाटन केले. यानंतर रक्तदानासाठी जवानांनी रांगा लावल्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आणि मास्क घालून अवघ्या दोन ते अडीच तासांत ८६ जवानांनी रक्तदान केले. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांची यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी दर्डा यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. समादेशकांनी भारत बटालियनच्या स्थापनेपासून आतापर्यंत जवानांनी स्वकष्टातून ओसाड परिसरात सुमारे ५० हजार झाडे लावून ती जगविल्याचे नमूद केले. शिवाय परिसरातील डोंगरावर आणि परिसरात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्याची व्यवस्था केली. यामुळे भूजल पातळी वाढल्याचेही सांगितले. घाटी रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीने रक्तसंकलन केले. या शिबिरासाठी समादेशक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक समादेशक इलियास शेख, सहायक समादेशक दिलीप तावरे, उपनिरीक्षक चव्हाण, प्रदीप पाटोळे, विशाल पगारे, हवालदार पुरुषोत्तम आघाव, राजाभाऊ खटाने, शिवराज पटवारी आणि उमेश तेजनकर यांनी पुढाकार घेतला.

----------------

चौकट

५५० जवानांची कोरोनावर मात

भारत बटालियनचे जवान गतवर्षापासून कोरोनाबाधित वसाहतीत बंदोबस्त करीत होते. त्यात ५५० जवान कोरोनाबाधित झाले होते. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न आणि मनोबल उंच ठेवल्याने सर्व बाधित जवानांनी कोरोनावर मात केल्याचे समादेशक सातपुते यांनी सांगितले. लोकमतच्या महारक्तदान शिबिराच्या स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.