शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

भागवत कराड यांनी मुलाला निवडून आणून दाखवावे; तनवाणी यांचा पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 14:28 IST

डॉ. कराड यांनी खुल्या प्रवर्गातून किमान मुलाला तरी निवडून आणून दाखवावे, असे खुले आव्हान तनवाणी यांनी दिले.

ठळक मुद्देभाजप पक्षाला मीच मोठे केले कराड यांनी अभ्यासपूर्ण बोलावे

औरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी त्यांच्या मुलाला उभे करून निवडून आणून दाखवावे. ते असे करू शकत नसतील तर त्यांनी राजकारण सोडून द्यावे. मुलाला निवडून आणल्यास मी राजकारण सोडून देईन. माझा भाऊ युतीच्या उमेदवाराच्या विरोधात गुलमंडीवरून अपक्ष निवडून आला होता. अपक्ष नगरसेवकांचा मी गट तयार करून  मुलाला स्वीकृत नगरसेवक केले. यामध्ये भाजपची काहीच मदत घेतली नाही. पक्षाने मला जे दिले त्यापेक्षा शंभरपट जास्त मी त्यांना दिले आहे. कराड यांनी अभ्यासपूर्ण बोलावे, असे मत सेनेत स्वृगही परतलेले माजी आ. किशनचंद तनवाणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. 

मागील सहा वर्षांमध्ये भाजपने मला खूप काही देऊन मोठे केलेले नाही, उलट मीच पक्षाला मोठे करण्याचे काम केले. २०१५ पूर्वी पक्षाचे फक्त १७ नगरसेवक होते. मी ही संख्या २३ पर्यंत नेली. ११ अपक्षांचा गट तयार करून भाजपच्या पाठीशी उभे करून संख्या ३४ पर्यंत नेली. माझ्यावर सत्तेचा आरोप करणाऱ्या डॉ. कराड यांनी खुल्या प्रवर्गातून किमान मुलाला तरी निवडून आणून दाखवावे, असे खुले आव्हान तनवाणी यांनी दिले. ‘किशचंद तनवाणी म्हणजे सत्तेच्या गुळाला लागलेला मुंगळा’ अशा शब्दांत डॉ. भागवत कराड यांनी ‘लोकमत’शी बोलताना टीका केली होती. या टीकेला संतापलेल्या तनवाणी यांनी जोरदार उत्तर दिले. २०१४ मध्ये सेना-भाजपची युती तुटली. मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपकडे उमेदवार नव्हता, म्हणून मला तिकीट दिले होते. यांच्याकडे एवढे सक्षम उमेदवार होते तर का तिकीट दिले नाही. २०१६ मध्ये मला शहराध्यक्ष केले. मागील चार वर्षांमध्ये मी पक्षाला जेवढे मोठे केले तेवढे तर कराड यांनी आयुष्यभरात पक्षाला मोठे केले नाही. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, वैैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, दिल्लीतील एक समिती घेतली. पक्षात योगदान काय तर शून्य. मागील पाच वर्षांत सत्ता असताना भाजपकडून काहीच घेतले नाही. एकनिष्ठ राहूनच काम केले. पक्षशिस्त, गद्दारी ही भाषा मला शिकवू नये, स्वत: कराड आणि पक्षातील नेत्यांनी स्वत:कडे बघावे मग कळेल. लाडगाव जि.प. सर्कलमध्ये पक्षविरोधी कारवाया कोणी केल्या...?

शहराध्यक्ष शहरात कमी, बाहेरच जास्तभाजपने नवनियुक्त शहराध्यक्ष शहरात कमी आणि बाहेरच जास्त असतात. त्यांनीही अभ्यासपूर्ण बोलावे. मी भाजपच्या जिवावर भाऊ, मुलाला निवडून आणले नाही. सध्या पक्षाचे संघटन आयते मिळाले आहे. मनपा निवडणुकीनंतर पक्ष कसा चालवतात, हे कळेल. शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष निवडीवर पक्षाचे किती नेते नाराज आहेत, हेसुद्धा लवकरच कळेल, असा टोलाही तनवाणी यांनी मारला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक