शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे भद्रा मारोती मंदिर बंद; खुलताबाद येथील व्यावसायिकांवर यंदा उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 19:23 IST

शेकडो लोक बेरोजगार झाले असून अनेक जण शेतमजुरीसाठी जात असल्याचे म्हटले.

ठळक मुद्देभद्रा मारुती जागृत देवस्थान म्हणून राज्यभरात प्रसिद्ध आहे.

- सुनील घोडके खुलताबाद (जि. औरंगाबाद) : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यात राज्यभरातून लाखो भाविक येत असतात. मात्र, यंदा कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने श्रावण महिन्यातील किमान दोन कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली. यामुळे भाविकांवर अवलंबून असलेल्या परिसरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

भद्रा मारुती जागृत देवस्थान म्हणून राज्यभरात प्रसिद्ध आहे. चार महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने व्यावसायिक संकटात असल्याचे व्यावसायिक संदीप औताडे यांनी सांगितले. देवस्थानचे सुरक्षा अधिकारी राजेंद्र जोंधळे म्हणाले, ‘‘शेकडो लोक बेरोजगार झाले असून अनेक जण शेतमजुरीसाठी जात असल्याचे म्हटले.’’  

जत्रेचे स्वरूपश्रावणातील दर शनिवारी, तर दोन लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून कोरोनामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट आहे.

पाच ट्रक नारळाची आवकहनुमान जयंतीला मोठी यात्रा असते व मोठी आर्थिक उलाढाल होते. मात्र, यावर्षी तीही झाली नाही. श्रावणातही मंदिर बंद असल्याने देवस्थानची दानपेटी, देणगी असा उत्पन्नाचा मार्ग बंद झाला. मंदिर परिसरात श्रावणात जवळपास पाच ट्रक नारळाची आवक होत असते व दीड लाख नारळ मारुतीच्या चरणी फोडले जातात.

भद्रा मारुती मंदिर परिसरात भाविकांवर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर मंदिर बंद असल्याने गेल्या चार महिन्यांपासून गंडांतर आले आहे. उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्याने यातील अनेक जण मजुरी, शेतमजुरीकडे वळले आहेत, तसेच मंदिर संस्थानलाही उत्पन्न मिळणे बंद  झाले.  - मिठ्ठू पाटील बारगळ, अध्यक्ष, भद्रा मारुती संस्थान

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याtourismपर्यटन