शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सावधान, वीजबिल न थकलेले बरे, व्याजदर बँकांपेक्षाही जास्त !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 17:08 IST

बिल वेळेवर भरलेलेच बरे, नाही तर महावितरणचे पथक तुमच्या दारी

औरंगाबाद : वीजबिल वेळेवर भरलेले बरे, असेच म्हणण्याची वेळ येत आहे. कारण वीजग्राहकांना वीजबिलाच्या थकबाकीवर व्याज द्यावे लागत आहे. वीजबिल थकीत ठेवणे परवडणारे नाही. बँकांपेक्षाही हे व्याजदर जास्त आहे. त्यामुळे व्याजाच्या रकमेचा भुर्दंड टाळण्यासाठी ग्राहकांनी वीजबिल वेळेवरच भरणे फायद्याचे ठरते.

थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. नामुष्की आणि व्याजाचा भुर्दंड असा दुहेरी फटका या ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी वेळीच बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.

व्याजाचा दर किती ?ग्राहकांनी वीजबिल तयार झाल्यानंतर ७ दिवसांत ते भरल्यास त्यांना १ टक्का तात्काळ देयक भरणा सूट मिळते. त्याबरोबरच वीजबिल थकीत ठेवल्यास विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार व्याजाची आकारणी केली जाते. देयक तयार होण्याच्या ६० ते ९० दिवसांत भरल्यास १२ टक्के व्याज आकारले जाते. ९० दिवसानंतर देयक भरल्यास १५ टक्के व्याज लागते.

चक्रवाढव्याज नाहीवीजबिलावर चक्रवाढ व्याज आकारले जात नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महिनाभर महावितरणच्या विजेचा वापर केल्यानंतर वीजबिल आल्यावर मोबाईल ॲप आणि महावितरणच्या वेबसाईटवर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. जवळच्या बिल भरणा केंद्रावर किंवा महावितरण कार्यालयात जाऊन भरणा करता येतो.

सर्वाधिक थकबाकी कृषी ग्राहकांचीसर्वाधिक थकबाकी ही कृषी ग्राहकांची आहे. वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार कृषी वाहिन्यांचे ऊर्जा अंकेक्षण करण्यासाठी उच्चदाब वीज वितरण प्रणाली अंतर्गत वीजजोडणी दिलेल्या कृषी ग्राहकांना प्री-पेड मीटर बसविण्यासाठी कार्यादेश देण्यात आलेले आहेत. मीटर बसविण्याची प्रक्रिया डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल.

वसुलीसाठी पथकांची स्थापनाजिल्ह्यातील वीजबिल थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष पथकांची स्थापना केली आहे. थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची पडताळणी करण्याची जबाबदारीही अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. वीज खंडित केल्यावरही कुणी वीज चोरून वापरत असेल तर त्या ग्राहकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

किती आहे जिल्ह्यात थकबाकी? (कोटी रुपये)वर्गवारी - मूळ थकबाकी - व्याज - एकूण थकबाकीघरगुती - ७०.६९ - १७.२४ - ८७.९३व्यावसायिक - ८.८४ -            १.५५ - १०.३९औद्योगिक - ८.८३            - ४.२६ - १३.०९कृषी - १७६६.०७ - ५७६.७ - २३४२.७७

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज