शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांनो काळजी घ्या, २४ तासांत वाढले तब्बल १०९७ नवे कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 12:31 IST

शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही वाढतोय उद्रेक

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी कोरोना रुग्णसंख्या एक हजार पार गेली. दिवसभरात तब्बल १०९७ रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ७६७ आणि ग्रामीण भागातील ३३० रुग्णांचा समावेश आहे. शहरापाठोपाठ ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. गेल्या २४ तासांत ३ रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात बरे झालेल्या तब्बल ५८० रुग्णांना सुटी देण्यात आली. तिसऱ्या लाटेतील कोरोनामुक्त रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. यामध्ये शहरातील पाचशे आणि ग्रामीण भागातील ८० रुग्णांचा समावेश आहे. गेले काही दिवस केवळ शहरात सर्वाधिक रुग्णांची भर पडत होती. मात्र, बुधवारी ग्रामीण भागातील रुग्णसंख्या थेट तीनशेपार गेली. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना कोरोनाने विळखा घातला आहे. ग्रामीण भागात गंगापूर तालुक्यात बुधवारी सर्वाधिक रुग्णांची भर पडली. तर उपचार सुरू असताना भीमनगर येथील ६२ वर्षीय पुरुष, रोशनगेट येथील ६५ वर्षीय पुरुष, शहानूरवाडी येथील ८२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णसमर्थनगर २, बिडकीन १, घाटी परिसर २, हर्सूल १, भारतनगर १, आरेफ कॉलनी १, हिलाल कॉलनी १, मिलिट्री हॉस्पिटल १, मयूर पार्क १, एअरपोर्ट स्टॉप १, नागेश्वरवाडी ३, चेलीपुरा १, बायजीपुरा २, हडको ३, राजाबाजार १, रोशन गेट १, जालना रोड १, बीड बायपास २, रशीदपुरा १, सिग्मा हॉस्पिटल परिसर ८, इटखेडा ६, पडेगाव ५, रेल्वेस्टेशन २, आर्मी कॅम्प २, पेठेनगर १, नंदनवन कॉलनी ३, बेगमपुरा २, मिटमिटा ३, जाधववाडी २,पहाडसिंगपुरा १, भावसिंगपुरा २, छावणी २, नक्षत्रवाडी १, उस्मानपुरा १०, झांबड इस्टेट १, संजयनगर १, गुलमंडी १, स्मार्ट सिटी १, गांधीनगर १, क्रांती चौक २, खडकेश्वर २, ज्योतीनगर ४, दर्गा रोड १, श्रेयनगर ३, संग्रामनगर १, शहानूरवाडी १, कांचनवाडी २, हनुमाननगर १, बाबा पेट्रोल पंप परिसर १, उदयनगर १, औरंगपुरा १, वेदांतनगर २, पैठण रोड १, गादिया विहार २, सातारा परिसर २, मिटमिटा १, अन्य ६५७.

ग्रामीण भागातील रुग्णऔरंगाबाद तालुका ७५, फुलंब्री १२, गंगापूर ८६, कन्नड ३५, खुलताबाद ६, सिल्लोड २२, वैजापूर ४१, पैठण ५०, सोयगाव ३.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या