शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी योजनांच्या लाभार्थी शेतकऱ्यांचे १६५ कोटी ८७ लाखांचे अनुदान थकले

By बापू सोळुंके | Updated: February 20, 2025 12:53 IST

‘लाडकी बहीण’मुळे कृषीचे पैसे वळविल्याची चर्चा

छत्रपती संभाजीनगर : केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अनुदानावर ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या लाभार्थ्यांना दोन वर्षांपासून अनुदानाचे पैसे मिळालेले नाहीत. आजपर्यंत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या अनुदानाचे सुमारे १६५ कोटी ८७ लाख ६० हजार १ रुपये शासनाकडे थकल्याचे सूत्रांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेमुळे अनुदान रखडल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.

पाण्याची बचत करणाऱ्या तुषार सिंचन, ठिबक सिंचनसारख्या पद्धतीचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, यासाठी सूक्ष्म सिंचनाची साधने अनुदानावर देण्यात येतात. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येते. त्यानंतर निवड झालेल्या लाभार्थ्याने तुषार सिंचन, ठिबक सिंचनचा सेट विशिष्ट एजन्सीकडून खरेदी करावा. हे साहित्य खरेदी केल्याची पावती तसेच सूक्ष्म सिंचन साहित्याचे छायाचित्र महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होते.

छत्रपती संभाजीनगर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत असलेल्या जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी दोन वर्षात राज्य आणि केंद्र पुरस्कृत योजनांचा लाभ घेतला. मुख्यमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेच्या २०२४-२५ मधील लाभार्थी शेतकऱ्यांचे ३९ कोटी ५२ लाख ६६ हजार रुपये तर प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांचे १२३ कोटी ६८ लाख ३९ हजार रुपये असे एकूण दोन्ही योजनांचे एकूण १६३ कोटी २१ लाख रुपयांचे अनुदान वर्षभरापासून शासनाकडे थकले आहे.

यासोबतच शासनाकडून शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबतच वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, कृषी यांत्रिकी उपविभाग आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मिनी ट्रॅक्टर, ट्रॅक्टर, फवारणी पंप, कृषी औजारे खरेदीसाठी अनुदान देण्यात येते. या योजनांच्या लाभार्थ्यांचेही दोन वर्षांपासून अनुदान रखडले आहे. सूत्रांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तिन्ही जिल्ह्यांतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या एकूण २ कोटी ६६ लाख ५५ हजार रुपयांची शासनाकडे थकबाकी आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी शासनाकडे या रकमेची मागणी केली आहे.

कोणत्या योजनेसाठी किती निधीची मागणी?राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण- २४ लाख ७० हजारकृषी यांत्रिकीकरण उपविभाग-- १ कोटी २३ लाख ७९ हजार ४००मुख्यमंत्री सूक्ष्म सिंचन योजना-- ३९ कोटी ५२ लाख ६६ हजारपंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजना- १२३ कोटी ६८ लाख ३९ हजार

मार्चपूर्वी अनुदानमार्चपूर्वी शासनाकडून निधी प्राप्त होईल आणि शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम लगेच अदा केली जाईल.- डॉ. तुकाराम मोटे, विभागीय कृषी सहसंचालक

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाAgriculture Sectorशेती क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर