शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

‘टीईटी’ पात्रताधारक शिक्षकांची याचिका खंडपीठाने फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 23:37 IST

औरंगाबाद : शिक्षक भरतीसाठीची माहिती ‘पवित्र पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्याची मुदत संपल्यानंतर (कट आॅफ डेटनंतर) याचिकाकर्त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ...

ठळक मुद्दे ‘पवित्र पोर्टल’वर माहिती ‘अपलोड’ करण्याची मुदत संपल्यानंतर केली होती परीक्षा उत्तीर्ण

औरंगाबाद : शिक्षक भरतीसाठीची माहिती ‘पवित्र पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्याची मुदत संपल्यानंतर (कट आॅफ डेटनंतर) याचिकाकर्त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण केली. या तांत्रिक कारणामुळे याचिकाकर्त्यांची माहिती स्वीकारण्याचे निर्देश राज्य शासनाला देण्याची विनंती करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न बी. वराळे आणि न्या. नितीन डब्ल्यू. सांबरे यांनी फेटाळली.माहिती अपलोड करण्याची मुदत संपल्यामुळे ‘पवित्र पोर्टल’वर याचिकाकर्त्यांच्या शैक्षणिक अर्हतेची नोंद घेता आली नाही. या कारणास्तव त्यांना नोकरीची संधी गमवावी लागणार असल्यामुळे याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली होती. मात्र, ही बाब मुदतबाह्य असल्यामुळे ‘कुठलीही प्रक्रिया सुरू केल्यानंतर ती अंतिम टप्प्यापर्यंत गेली पाहिजे,’ असे निरीक्षण नोंदवीत खंडपीठाने शिक्षक संघटनेची याचिका फेटाळली.राज्यातील शिक्षक आणि शिक्षणसेवकांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार आणि अनुभवानुसार नियुक्ती मिळावी यासाठी ‘बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा २००९’ अंतर्गत राज्य शासनाने २३ जून २०१७ च्या शासन निर्णयाद्वारे ‘पवित्र पोर्टल’ प्रक्रिया सुरू केली होती. शासनाने शिक्षकांना त्यांची किरकोळ माहिती ‘अपलोड’ करण्यासाठी वेळोवेळी परवानगी दिली होती. माहिती ‘अपलोड’ करण्याची अंतिम मुदत २१ सप्टेंबर २०१८ होती. याचिकाकर्त्यांनी १ आॅक्टोबर २०१८ रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण केली होती. त्यामुळे त्यांना माहिती अपलोड करता आली नाही. परिणामी, नोकरीची संधी गमवावी लागेल, या भीतीपोटी नांदेड येथील दी महाराष्टÑ राज्य उर्दू शिक्षक संघटना व इतर यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान अतिरिक्त सरकारी वकील अर्चना गोंधळेकर यांनी वरील तांत्रिक बाबी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिल्या.राज्य शासनाने संपूर्ण प्रक्रिया ठराविक वेळापत्रकानुसार संगणकीय पद्धतीने राबविली. परिणामी, आता त्यात हस्तक्षेप करणे शक्य नाही, असेही निरीक्षण नोंदवीत खंडपीठाने याचिका फेटाळली. या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. व्ही.जी. सलगरे आणि प्रतिवाद्यातर्फे अ‍ॅड. डी.जी. नागोडे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयTeacherशिक्षक