शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

गळ टोचून घेणाऱ्या भाविकावर गुन्हा दाखल करून पोलीस आणि देवस्थान न्यासाला सहआरोपी करण्याचा खंडपीठाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:07 IST

शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेतील भक्तांच्या पाठीत गळ टोचण्याच्या स्थळावर पोलीस निरीक्षक दर्जाच्या एक किंवा अधिक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. पुढील दोन दिवसांत यात्रेत गळ टोचून घेणाºया भक्तांवर ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत’ गुन्हा नोंदवावा. तसेच गळ टोचून घेताना त्याकडे दुर्लक्ष केल्याचे गृहित धरुन पोलीस आणि देवस्थान न्यासाला (ट्रस्टला) सहआरोपी करावे, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न बी. वराळे आणि न्या. नितीन. डब्ल्यू. सांबरे यांनी बुधवारी (दि.२४ ) दिला.

औरंगाबाद : शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेतील भक्तांच्या पाठीत गळ टोचण्याच्या स्थळावर पोलीस निरीक्षक दर्जाच्या एक किंवा अधिक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. पुढील दोन दिवसांत यात्रेत गळ टोचून घेणाºया भक्तांवर ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत’ गुन्हा नोंदवावा. तसेच गळ टोचून घेताना त्याकडे दुर्लक्ष केल्याचे गृहित धरुन पोलीस आणि देवस्थान न्यासाला (ट्रस्टला) सहआरोपी करावे, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न बी. वराळे आणि न्या. नितीन. डब्ल्यू. सांबरे यांनी बुधवारी (दि.२४ ) दिला.जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या संदर्भात खंडपीठात अहवाल सादर करावा. याचिकाकर्त्याच्या वकिलांनीही यात्रेदरम्यान गळ टोचण्याचे कृत्य होते का याकडे लक्ष द्यावे, असेही आदेशात म्हटले असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले. याचिकेवर शुक्रवारी (दि.२६) सुनावणी होणार आहे.लाल सेनेचे अध्यक्ष गणपत भिसे यांनी अ‍ॅड. अंगद कानडे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. शेंद्रा येथे दरवर्षी लाखो भाविक मांगीरबाबाला बोललेले नवस फेडण्यासाठी कोंबडे, बकºयांचा बळी देतात व स्वत:च्या पाठीत लोखंडी गळ (हूक) टोचून घेण्यासारखे अघोरी प्रकार करतात. या अनिष्ट प्रथेमुळे आजपर्यंतच्या अनुभवाप्रमाणे अनेक भक्तांना संसर्गजन्य रोगाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे लाल सेनेने या प्रथेविरुद्ध संस्थापक अध्यक्ष गणपत देवराव भिसे यांनी बेमुदत उपोषणही केले होते. प्रथा बंद होण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मांगीरबाबा देवस्थान ट्रस्ट यांच्याकडेही मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही गतवर्षी हजारो भाविकांनी अंगात लोखंडी गळ टोचून घेऊन नवस फेडले होते.याचिकेच्या सुनावणीदरम्यान महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ च्या अनुसूची ३ प्रमाणे स्वत:च्या अंगाला इजा करणे बेकायदेशीर असून, ही अनिष्ट प्रथा लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करीत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालयShendra MIDCशेंद्रा एमआयडीसी