भूम : विविध मागण्यांसाठी तालुक्यातील चारा छावणीचालकांनी पुकारलेला संप दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आला़ छावणी चालक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत छावणीचालकांच्या मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर छावणीचालकांनी संप मागे घेतला़ छावण्या पूर्ववत सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे़छावणी चालकांना लावण्यात येणारा विनाकारणचा दंड, इतर जिल्ह्यातून चारा आणताना होणाऱ्या कारवाई, तलावातून पाणी उपलब्ध करून द्यावे, अनुदान उपलब्ध करून द्यावे यासह इतर विविध मागण्यांसाठी तालुक्यातील ४३ पैकी २७ छावणीचालकांनी मंगळवारपासून दैनंदिन रिपोर्ट व चारा बंद केला होता़ यामुळे पशुपालक, शेतकरी चिंताग्रस्त झाले होते़ छावणीचालकांच्या बंदची तत्काळ दखल घेत बुधवारी छावणीचालकांची येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली़ यावेळी उपविभागीय अधिकारी प्रविण पवार, तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी छावणीचालकांच्या मागण्या ऐकून घेत त्यांच्याशी चर्चा केली़ प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत २७ टक्के राखीव (कपात) रक्कम बाबत पुढील आठवड्यात चर्चा करून प्रश्न मार्गी काढणे, इतर जिल्ह्यातून चारा आणताना कारवाई होवू नये म्हणून उपाययोजना करणे, अनुदान वाढवून देण्याबाबत चर्चा करून हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले़ तसेच छावणीचालकांना तलावातून पाणी घेण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला़ यावेळी छावणी चालक सतीश सोन्ने, बाळासाहेब क्षीरसागर, काकासाहेब चव्हाण, माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात, प्रवीण खटाळ, मधुकर अर्जुन, भाऊसाहेब मुंढे, उमेश नायकिंदे, अशोक नलवडे आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)
ुेभूम तालुक्यातील छावणी चालकांचा बंद मागे
By admin | Updated: April 7, 2016 00:22 IST