शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पर्युषण महापर्वाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:52 IST

पर्वाधिराज पर्युषण महापर्वाला आज ६ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने शहरातील विविध ठिकाणच्या जैन स्थानकांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम व विशेष प्रवचनाला आज भाविकांची गर्दी होती.

ठळक मुद्देधार्मिक : औरंगाबाद शहरातील जैन स्थानक व मंदिरात आठ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पर्वाधिराज पर्युषण महापर्वाला आज ६ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने शहरातील विविध ठिकाणच्या जैन स्थानकांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम व विशेष प्रवचनाला आज भाविकांची गर्दी होती.कुंभारवाडा येथील महावीर भवन येथे जैन स्थानकवासी श्रावक संघाच्या वतीने पर्युषण पर्वाचा पहिला दिवस ‘दर्शन दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. उपप्रवर्तिनी कंचनकवरजी म. सा. आदी ठाणा ६ यांचे आज प्रवचन झाले. अष्टदिवसीय अखंड नवकार महामंत्र जपालाही सुरुवात झाली.विमलनाथ जैन मंदिरजैन श्वेतांबर मूर्तिपूजक श्री संघाच्या वतीने जाधवमंडी येथील विमलनाथ जैन मंदिरात पर्युषण पर्वाला सुरुवात झाली. यानिमित्त मंदिर आकर्षकरीत्या सजविण्यात आले आहे. वीरसैनिक केतनभाई, विरलभाई, भावीनभाई व ऋषभभाई यांनी सकाळी ९ वाजता आरोग्याविषयी सर्वांना मार्गदर्शन केले. रात्री नाटिका सादर करण्यात आली.शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिरसिडको एन-३ येथील शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिरात सकाळी भगवंतांचा अभिषेक, केशर पूजा, धूप पूजा, आरती करण्यात आली. सायंकाळी अहिंसा भवन येथे प्रतिक्रमण करण्यात आले. जैन संगीतकार दीपक कर्णपुरिया यांच्या भक्तिसंध्येच्या कार्यक्रमाला भाविक हजर होते.कर्णपुरा जैन मंदिरकर्णपुरा येथील गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर व मुनीसुव्रतस्वामी जैन श्वेतांबर ट्रस्टतर्फे कर्णपुरा येथे पर्युषण महापर्वानिमित्त पहाटे दररोज ५.३० वाजता प्रतिक्रमण करण्यात आले. सकाळी साध्वीजींचे प्रवचन झाले. दुपारी पूजा करण्यात आली व रात्री भक्तिसंगीताचा कार्यक्रम पार पडला. तसेच जोहरीवाडा येथील जैन मंदिरातही धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहे.अहिंसानगर जैन श्रावक संघयेथे महासतीजी सुयशाश्रीजी म. सा., सूरम्यश्रीजी म.सा., सुपद्मश्रीजी म.सा., सुदक्षाश्रीजी म. सा. ठाणा ४ यांच्या मार्गदर्शनाखाली पर्युषण पर्वाला सुरुवात झाली. अनेक भाविकांनी नवकार महामंत्र जप केला.तेरापंथ भवन येथे आजपासून पर्युषण पर्वपानदरिबा येथील तेरापंथ भवन येथे उद्या ७ सप्टेंबर रोजी पर्युषण पर्वाला सुरुवात होत आहे. आचार्यश्री महाश्रमणश्रीजीच्या आदेशानुसार येथे आराधनेसाठी उपासक प्रवक्ता सुरेंद्र सेठिया, सहयोगी उपासक डॉ. संजय हिरण यांचे आगमन झाले आहे. पुढील आठ दिवस दररोज सकाळी प्रतिक्रमण व प्रार्थना, प्रवचन, दुपारी धार्मिक चर्चा व सायंकाळी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती तेरापंथी सभेच्या वतीने कळविण्यात आली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादReligious programmeधार्मिक कार्यक्रम