शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
3
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
4
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
5
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
6
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
7
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
8
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
9
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
10
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
11
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
12
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
13
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
14
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
15
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
16
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
17
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
18
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
19
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
20
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी

बीडच्या अवैध गर्भपात प्रकरणाची औरंगाबादेत पुनरावृत्ती; महिलेची प्रकृती गंभीर, डॉक्टर फरार

By योगेश पायघन | Updated: February 5, 2023 00:51 IST

चितेगाव येथील खाजगी रुग्णालयावर छापा, २ डाॅक्टर फरार, मध्यरात्रीपर्यंत चौकशी सुरू

औरंगाबाद : बीडमध्ये गाजलेल्या अवैध गर्भपाताची औरंगाबादमध्ये पुनरावृत्ती झाल्याची घटना शनिवारी रात्री समोर आली. चितेगाव येथील खाजगी रुग्णालयात अवैधरीत्या गर्भपात झाल्याचे उघडकीस आले. या रुग्णालयात गर्भपात करताना प्रकृती गंभीर झालेली महिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिस आणि आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकाने या रुग्णालयात रात्री आठ वाजेच्या सुमारास छापा मारला. त्यावेळी येथील २ डाॅक्टर फरार झाले. रात्री उशिरापर्यंत झाडाझडती सुरू झाली.

याविषयी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देसगाव पाडवी (जि. बुलडाणा) येथील २७ वर्षीय महिला गुरुवारी घाटी रुग्णालयात दाखल झाली. पोटात दुखत असल्याची महिलेची तक्रार होती. स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाच्या डाॅक्टरांनी तपासले असता त्या महिलेचा गर्भ हा गर्भपिशवीच्या बाहेर आला होता. शिवाय गर्भपिशवीही फाटलेली होती. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करून या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांत नोंद करण्यात आली. यानंतर शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास आरोग्य विभागाच्या पथकासह बिडकीन पोलिसांनी चितेगाव येथील ‘औरंगाबाद स्त्री रुग्णालय’ नावाच्या या दवाखान्यावर छापा टाकला. तेव्हा रुग्णालयातील डाॅक्टर पळून गेले होते. रुग्णालयात निर्बंध असलेली औषधी आणि गर्भपातासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या प्रकरणी उशिरापर्यंत कारवाई व चौकशी सुरू होती.

बोगस डाॅक्टर असल्याचे पथकाचे निरीक्षणया घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे यांनी महिलेच्या प्रकृतीचा आढावा घेतला. छापा टाकलेल्या पीसीपीएनडीटी पथकात जिल्हा रुग्णालयाचे स्त्रीरोग विभागाचे प्रमुख डाॅ. कमलाकर मुदखेडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. संतोष कडले, अॅड. रश्मी शिंदे यांचा समावेश होता. पथकाने महिलेचा गर्भापात करणारे डाॅक्टर बोगस असावेत असे प्राथमिक निरीक्षण नोंदवले.

महिलेवर आयसीयुत उपचार सुरूमहिलेची प्रकृती गंभीर असून महिलेवर घाटी रुग्णालयात आयसीयुत डाॅ. श्रीनिवास गडप्पा यांच्या मार्गदर्शनात उपचार सुरू आहेत. फरार असलेले डाॅक्टर पती पत्नी असल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे. मात्र, याला दुजोरा मिळाला नाही. तर बिडकीन पोलिस ठाण्याचे एपीआय संतोष माने यांनी ही वैद्यकीय विभागाची कारवाई असून अजून सुरू असल्याचे शनिवारी रात्री साडे अकरा वाजता सांगितले.

व्याप्ती वाढण्याची शक्यता...अर्धवट गर्भपाताची अनेक प्रकरणे गेल्या काही महिन्यांत घाटी रुग्णालयात दाखल झाले. मात्र, नेमका गर्भपात कोठे केला हे समोर येत नव्हते. यावेळी रुग्णालयाचे नाव समोर आल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादdocterडॉक्टर