लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात रक्तदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीमुळे रक्त संकलन सुलभ होत असून रक्त पेढीच्या आवश्यकतेनुसार दात्यांचे रक्तदान हे माणुसकीचे बंध आणखी दृढ करत आहे. बीड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत मागील वर्षात १४ हजार बॅग रक्त संकलन झाले. पुणे, मुंबई सोडल्यास राज्यात हा आकडा विक्रमी ठरला आहे. जागतिक रक्तदाता दिनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढी विभाग प्रमुख डॉ. जयश्री बांगर ‘लोकमत’शी बोलत होत्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तपेढीचे कामकाज उत्तमरित्या चालले आहे. बीड जिल्हा रुग्णालयात व गरजूंना लागेल तेव्हा रक्त पुरवठा केला जात आहे.सध्या पुरेसा रक्तसाठा असला तरी जनजागृती व्यापक प्रमाणात करण्यासाठी स्वयंसेवी आणि सामाजिक, धार्मिक संस्थांची मदत घेतली जात आहे. १४ जून रोजी या संदर्भात रॅली काढण्यात येणार असून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक व इतर अधिकारी यात सहभागी होणार असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, वर्षभर रक्तदान करण्यासाठी नागरिकांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृतीही केली जाते.
राज्यामध्ये रक्त संकलनात बीड जिल्हा रुग्णालय प्रथम
By admin | Updated: June 14, 2017 00:28 IST