शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
2
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
3
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
4
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
5
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
6
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
7
EVM मध्ये ३६ मतांची आघाडी, पण ३६० पोस्टल मते बाद झाली आणि पारडे फिरले, बिहारमधील अजब निकाल चर्चेत
8
Supreme Court: संसद न्यायालयीन निर्णयावर कुरघोडी करू शकत नाही; लवाद सुधारणा कायद्याच्या तरतुदी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
9
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
10
रॅपिडो ड्रायव्हर महिन्याला कमावतोय १ लाख रुपये, उत्पन्नाचे स्रोत वाचून बसेल धक्का
11
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
12
"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी
13
"मी रुतबीला फिरायला नेतो..."; दीड वर्षांच्या लेकीला वडिलांनी फेकलं नदीत, हवा होता मुलगा
14
'धुरंधर' सिनेमात 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनची एन्ट्री, म्हणाली - "माझ्या सीन्सकडे..."
15
होम लोन स्वस्त आणि पर्सनल लोन महाग का असतं? बँका का ठेवतात व्याजदरात फरक, जाणून घ्या
16
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
17
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
18
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
19
Mumbai: वर्षाभरात ६१ क्लास वन अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात; तरीही २०९ लाचखोरांचे निलंबन नाही!
20
दिल्ली स्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठ रडारवर; 200 हून अधिक शिक्षक-डॉक्टरांची चौकशी
Daily Top 2Weekly Top 5

बीड बायपासवर निष्पापांचे रक्त महापालिकेमुळे सांडू लागले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 20:03 IST

रस्ता रुंदीकरणासाठी महापालिका मागील तीन वर्षांपासून निव्वळ तांत्रिक नाट्य रचत आहे.

ठळक मुद्देआणखी किती नागरिकांचे बळी हवेतरस्ता रुंदीकरणाकडे दुर्लक्ष

औरंगाबाद :  बीड बायपास रोड मृत्यूचा सापळा बनला आहे. महिन्यातून एक किंवा दोन निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. रस्ता रुंदीकरणासाठी महापालिका मागील तीन वर्षांपासून निव्वळ तांत्रिक नाट्य रचत आहे. गुरुवारी मध्यरात्री १ वाजता एका निष्पाप तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पुन्हा एकदा बीड बायपासच्या रुंदीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

मागील तीन ते चार वर्षांमध्ये बीड बायपासवर वेगवेगळ्या अपघातांत मरण पावलेल्या नागरिकांची संख्या शंभरहून अधिक आहे. ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा महिला अपघातात मरण पावली असेल त्यांच्यावर केवढा मोठा डोंगर कोसळला असेल याची जाणीवही महापालिकेतील कारभाºयांना नाही. निष्ठुर महापालिकेने दोन वर्षांपूर्वी बीड बायपास रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड करण्याची घोषणा मोठ्या जोमाने केली. मात्र, कृतीमध्ये महापालिका अपयशी ठरली.

बीड बायपासला लागून असलेल्या मालमत्ताधारकांनी खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठाने महापालिकेला सर्वांची सुनावणी घेतल्यानंतर निर्णय घ्यावा, असे आदेशित केले होते. यापूर्वीच मालमत्ताधारकांची सुनावणी घेण्यात आली. परंतु तत्कालीन आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली झाल्याने नव्याने सुनावणी घेण्यात आली. ६ आॅगस्ट २०१८ रोजी सुनावणी पूर्ण झाली. दरम्यान, बीड बायपास रोडवर सतत अपघात होत असल्यामुळे संवेदनशील आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी त्वरित बायपासवर सायकलने धाव घेऊन पाहणी केली होती.

येथील अपघात सत्र थांबविण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी तर पाहणीसह बैठकीचे आयोजनही केले होते. या रस्त्यावर एकही अतिक्रमण दिसणार नाही, अशी घोषणा महापौरांनी केली होती. तत्कालीन पदनिर्देशित अधिकारी अभंग यांनी कारवाईसुद्धा केली होती. मात्र, बीड बायपासला साईड रोड करण्यासाठी प्रलंबित असलेली संचिका आजही प्रशासन प्रमुखांकडे पडून आहे.  

दोन वर्षांपूर्वीच मार्किंगमहापालिकेने बीड बायपास रोडवरील मालमत्तांवर दोन वर्षांपूर्वीच मार्किंगही केली आहे. शहर विकास आराखड्यातील नकाशानुसार महापालिकेने ही कारवाई केली. रुंदीकरण करायचेच नव्हते तर मार्किंगचे नाट्य तरी मनपाने कशासाठी केले, असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 

बायपासवर नागरिकांचा रास्ता रोकोसर्व्हिस रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, बायपासवर आठवडाभराच्या अंतराने सलग तिसरा बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी रास्ता रोको करून आंदोलनाचा इशारा दिला. पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी आंदोलकांसोबत चर्चा करून सार्वजनिक बांधकाम, जागतिक रस्ते विकास प्रकल्प अधिकारी, मनपा इत्यादी यंत्रणेसोबत चर्चा करून त्यावर तोडगा काढता येईल, असे सांगितल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. तात्काळ रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्यात आले.  यावेळी शिष्टमंडळात काँग्रेसचे शेख गुलाब, जुबेर मिर्झा, तरबेजभाई, हासन चाऊस, नवीद खान, शेख इरशू आदींसह नागरिकांचा सहभाग होता.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAccidentअपघात