शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाखात तलाठी व्हा! परीक्षा केंद्रातून १६ व्या मिनिटाला प्रश्नपत्रिका बाहेर,अर्ध्या तासांत उत्तरे

By सुमित डोळे | Updated: September 7, 2023 17:11 IST

९ वाजता परीक्षा सुरू, ९.१६ वाजता टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका, ९.४८ वाजता उत्तरे आली

छत्रपती संभाजीनगर : वनरक्षक पदाच्या परीक्षेत शहरात सहा घोटाळे समोर आले. आता तलाठी परीक्षेतही घोटाळेबाजांचे रॅकेट सक्रिय झाले असून थेट परीक्षा केंद्रातच उत्तरे पुरवली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राजू भीमराव नागरे (२९, रा. कातराबाद) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता चिकलठाण्यातील ईऑन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेर तो परीक्षार्थीला उत्तरे पुरवण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांना रंगेहाथ सापडला. त्याचे तीन साथीदार मात्र पोलिसांच्या तावडीतून पळून गेले.

एमआयडीसी सिडकोचे उपनिरीक्षक आत्माराम घुगे, सचिन जाधव, अंमलदार संतोष सोनवणे, देविदास काळे, प्रकाश सोनवणे, संतोष गायकवाड सोमवारी दुचाकी चोराच्या शोधात होते. साडेचार वाजता सदर केंद्राच्या बाहेरून जात असताना त्यांना चार तरुण संशयास्पदरीत्या दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले असता चौघांनी धूम ठोकली. राजू मात्र पथकाच्या हाती लागला. राजूच्या खिशात मास्टर कार्ड, दोन मोबाईल मिळाले. त्यातील टेलिग्रामवर तलाठी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे ३४ प्रश्नांचे छायाचित्र पाहून पोलिसांना धक्का बसला. आतील एका परीक्षार्थीला आम्ही उत्तरे पुरवल्याचे त्याने कबूल केले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

सकाळी यशस्वी, सायंकाळी अटक-राजूने सकाळी ९ वाजेच्या परीक्षेत एका उमेदवाराला यशस्वीरीत्या उत्तरे पुरवल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले. सायंकाळी ४ च्या परीक्षेतही तो उत्तर पुरवण्याच्या तयारीत होता. मात्र, त्यापूर्वी पोलिसांच्या हाती लागला.-नऊ वाजता परीक्षा सुरू होताच अवघ्या १६ व्या मिनिटाला राजूच्या टेलिग्रामवर ३४ छायाचित्रांमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका आली होती. विजय पाटील नामक आरोपीने त्याला ९.४८ वाजता दोन कागदांवर संपूर्ण उत्तरे पाठवल्याचे आढळले.

अन् उपनिरीक्षक पद हुकलेबी. कॉम झालेल्या राजूने उपनिरीक्षकपदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण केली होती. मैदानी चाचणीच्या आधी त्याच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल झाला आणि त्याची संधी हुकली. त्यानंतर तो परीक्षा घोटाळ्याच्या रॅकेट मध्ये उतरला. दहा लाख रुपयांमध्ये त्याची टोळी उत्तरे थेट केंद्रात पुरवण्याचा दावा करतात. व्हॉट्सॲप चॅटिंग मध्ये त्याचा उलगडा झाला. ऑगस्ट महिन्यात वनरक्षक परीक्षेत सांगलीच्या घोटाळ्यात पोलिस त्याच्या शोधात होते. त्याच्यावर असे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षाRevenue Departmentमहसूल विभागCrime Newsगुन्हेगारी