सतीश जोशी, परभणीमाझ्या यशामध्ये अनेक जण गुरुस्थानी असले तरी काही गुरु जणांचा उल्लेख मात्र आवर्जून करावा लागेल. त्यांच्या छोट्या-छोट्याशा मौलिक सूचनांमुळे मी आयएएस झालो, असे परभणी येथील लोकेश रामचंद्र जांगिड यांनी सांगितले.शालेय शिक्षण घेताना मॉडेल इंग्लिश स्कुलचे मनोज सुभेदार, अतुल देशपांडे, बालविद्यामंदिरचे मल्लिकार्जुन पोखरकर, अभियांत्रिकी शिक्षण घेताना नांदेड येथील श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.नलावडे, प्रा. चव्हाण यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. सुभेदार सरांमुळे अस्खलीत इंग्रजी भाषा शिकलो. देशपांडे सरांमुळे माझ्यातील कौशल्य बाहेर आले. पोखरकर सरांनी माझ्यातील क्षमतेचे दर्शन घडवून आत्मविश्वास जागृत केला. चव्हाण सरांनी ज्ञानार्जनासाठी वाचनाचे महत्त्व सांगितले. आपण असे काही कर्तृत्व केले पाहिजे, की इतरांसाठी आदर्श ठरावा, असे मार्गदर्शन प्रा.चव्हाण यांनी केले होते. या सर्वांच्या या मौलिक मार्गदर्शनामुळेच मी आयएएसमध्ये यशस्वी झालो.उद्या शनिवारी गुरुपौर्णिमा. प्रत्येकाच्या आयुष्यातील यशामध्ये गुरुचे स्थान तितकेच महत्त्वाचे. गुरुशिवाय यश अशक्यच, असे म्हटले तरी वावगे नाही. यानिमित्त नुकत्याच झालेल्या युपीएससी परीक्षेत देशात ६८ वा येवून आयएएस झालेल्या परभणीच्या लोकेश जांगिड यांच्यााशी चर्चा केली.गुरुमुळेच मी आज घडलो आणि यश संपादन केले, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
गुरुजनांमुळेच मला यश
By admin | Updated: July 12, 2014 01:12 IST