======(=====(=((====((
कंटेनरची रिक्षा, टपरीला धडक
औरंगाबाद: नियंत्रण सुटल्याने भरधाव कंटेनरने रिक्षाला धडक दिली. जोरदार आघाताने ही रिक्षा उलटून पानटपरीवर आदळली. या अपघातात रिक्षा आणि पानटपरीचे नुकसान झाले आणि रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात बायपासवरील गुरू लॉनजवळ १० एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता झाला.
शेख सत्तार शेख रज्जाक (३३, रा. दादा कॉलनी, संजयनगर, बायजीपुरा) असे जखमीचे नाव आहे. शेख सत्तार हे लोडींग रिक्षाने (एमएच-२०-ईएफ-१३२६) फरशीच्या दुकानावर जात होते. याचवेळी मागून वेगात आलेल्या कंटेनरने (एमएच-२१-बीएच-०६९५)लोडींग रिक्षाला धडक दिली. यामुळे रिक्षाजवळील पानटपरीवर आदळली. यात सत्तार जखमी झाले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.