प्रेम करत नाही म्हणून महिलेची मारहाण
By | Published: December 7, 2020 04:00 AM2020-12-07T04:00:06+5:302020-12-07T04:00:06+5:30
कामगार नेत्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल औरंगाबाद : चोरी करण्याच्या उद्देशाने अंधारात लपून बसलेल्या कामगार नेत्याच्या मुलासह एकाला गस्तीवर असलेल्या ...
कामगार नेत्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
औरंगाबाद : चोरी करण्याच्या उद्देशाने अंधारात लपून बसलेल्या कामगार नेत्याच्या मुलासह एकाला गस्तीवर असलेल्या छावणी पोलिसांनी शनिवारी रात्री पडेगाव भागात पकडले. अनमोल बुद्धीनाथ बराळ (३२, रा. खोकडपुरा) व तौफिक अल्ताफ कुरेशी (२०, रा. नूतन कॉलनी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. ते पडेगाव भागातील मीरानगर येथील मोकळ्या मैदानाजवळ लपून बसले होते.
चाटभंडार दुकानदाराला मारहाण
औरंगाबाद : रंगारगल्ली येथील गायत्री चाटभंडारचे मालक दिनेश बालकिसन तिवारी व त्यांचा पुतण्या अभिजीत अशोक तिवारी हे दुकानात बसलेले असताना दिनेश नागनाथ पोटपिल्लेवार हा तेथे गेला. त्याने कचोरी मागितली तेव्हा काउंटरवर पैसे जमा कर, असे दुकानदाराने सांगितले. याच राग अनावर झाल्यामुळे दिनेश पोटपिल्लेवार याने हातातील कड्याने त्यांचे डोके फोडले. याप्रकरणी सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरलेला धनादेश वटविण्याचा प्रयत्न
औरंगाबाद : दोन जीवाभावाचे मित्र बँकेत धनादेश जमा करण्यासाठी गेले. तेव्हा एकाने धनादेश चोरून स्वत:च्या नावे त्या धनादेशावर ६१ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम नोंदवून तो बँकेत जमा करण्याचा प्रयत्न केला. ही घटना १९ जून २०१९ रोजी घडली होती. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार लहू उत्तम जाधव (३२, रा. त्रिमूर्तीनगर, देवळाई परिसर) यांच्या तक्रारीवरून अंकित संजय मुथियान (रा. ब्युबेल्स सोसायटी) याच्याविरुद्ध वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल
औरंगाबाद : शनिवारी सकाळी पती कामावर गेल्यानंतर त्यांची पत्नी प्रकृती बरी नसल्यामुळे मुलीला घरी ठेवून दवाखान्यात गेली होती. दवाखान्यात परत आल्यानंतर घराला कुलूप लावलेले दिसले. त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे मुकुंदवाडी परिसरातील शैलेश पंडित यानेच आपल्या मुलीचे अपरहण केले असावे, अशी तक्रार मुकुंदवाडी ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
दोन दारुड्यांकडून रिक्षाचालकास मारहाण
औरंगाबाद : मिसारवाडी गल्ली नं. १० येथील रिक्षास्थानकावर प्रवाशांच्या प्रतीक्षेत थांबलेल्या रिक्षाचालकास दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या दोन भावांनी क्षुल्लक कारणावरून बियरची बाटली कपाळावर मारून जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या रिक्षाचालकाच्या आईलाही त्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी रिक्षाचालक सुनील जनार्दन फलके (३४, रा. मिसारवाडी) यांच्या तक्रारीनुसार सिडको ठाण्यात फिरोज व त्याचा भाऊ इम्रान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरी करण्याच्या हेतू; दोघांना अटक
औरंगाबाद : गस्तीवर असलेल्या क्रांती चौक पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानकामध्ये शुक्रवारी रात्री अंधारात लपून बसलेल्या दोघा जणांना पकडले. मोहम्मद इस्त्याक मोहम्मद युसूफ (२७, रा. शहाबाजार, काळी मशिदीजवळ) व आमेर खान सलीम खान (२७, रा, कासंबरी दर्गा), अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
महिलेकडे पाहून अश्लील चाळे
औरंगाबाद : जुना मालजीपुरा येथील तुकनगिरी मठाजवळ एक महिला आपल्या ओट्याचे बांधकाम करत असताना काही अंतरावर जगदीश कांचनगिरी मेहता हा भामटा बनियान व अंडरपँट परिधान करून उभा होता. मला इथे मुडदे गाडायचे आहेत, असे म्हणत त्याने अश्लील चाळे करत महिलेचा विनयभंग केला व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामगारावर चाकूहल्ला
औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतून काम आटोपल्यावर घराकडे पायी निघालेल्या कामगाराच्या अंगावर काळा गणपती मंदिरासमोर एका दुचाकीवरून तिघेजण राँग साईडने आले व त्यांनी दुचाकी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. गाडी नीट चालवता येत नाही का, असा प्रश्न केला. ते दुचाकीवरून उतरले व बेदम मारहाण करून चाकूने हातावर वार केला. याप्रकरणी दशरथ सुरेश मोरे (२३, न्यायनगर) यांच्या तक्रारीनुसार तीन अनोळखी आरोपींविरुद्ध एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बन्सीलालनगरातून दुचाकी लंपास
औरंगाबाद : व्यापारी गोपाल रतनलाल (५४, रा. बन्सीलालनगर) यांनी घरासमोर उभी करून ठेवलेली मोटारसायकल (एमएच २० सीए ७०५०) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना २७ नोव्हेंबर रोजी उत्तररात्री घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध छावणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.