शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

गुणवंत आहातच, आता कीर्तिवंत व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:59 IST

दहावीची परीक्षा हा करिअरचा एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. या टप्प्यावर तुम्ही उज्ज्वल यश मिळवले आहे. यातूनच तुम्ही गुणवंत आहात हे सिद्ध होते. आता इथून पुढे करिअरची योग्य निवड करून कीर्तिवंत व्हा, अशा शब्दांत उच्चशिक्षण, सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांनी सोमवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दहावीची परीक्षा हा करिअरचा एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. या टप्प्यावर तुम्ही उज्ज्वल यश मिळवले आहे. यातूनच तुम्ही गुणवंत आहात हे सिद्ध होते. आता इथून पुढे करिअरची योग्य निवड करून कीर्तिवंत व्हा, अशा शब्दांत उच्चशिक्षण, सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांनी सोमवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.दहावी परीक्षेत उत्तम गुणांनी पास झालेल्या गुणवंतांचे कौतुक करण्यासाठी ‘लोकमत’ आणि रेझोनन्स स्टडी सेंटर, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गौरव गुणवंतांचा’ या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संत तुकाराम नाट्य मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात डॉ. देशपांडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी व्यासपीठावर रेझोनन्स स्टडी सेंटरचे अवलेश शर्मा, अनिल त्रिपाठी, मृदुला मीनाक्षी, अंकु र सैनी, भुपेश झा, सुधीर सोनी, फरहा शेख यांची विशेष उपस्थिती होती.विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. देशपांडे म्हणाले की, अनेक थोर पुरुषांप्रमाणे तुम्ही तुमची स्वतंत्र ओळख निर्माण करा तसेच करिअरच्या पारंपरिक वाटा चोखळण्यासोबतच एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षांचाही आवर्जून विचार करा.आजकाल सहजपणे उपलब्ध असणाऱ्या मोबाईल, इंटरनेट या गोष्टींचा तुमच्या ज्ञानासाठी योग्य उपयोग करावा, असेही त्यांनी सुचविले.यानंतर प्रा. अनिल त्रिपाठी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेत होणाºया क्षुल्लक चुका कशा टाळल्या जाऊ शकतात, याविषयी माहिती दिली आणि इथून पुढच्या करिअरमध्ये कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना सर्वप्रथम संकल्पना समजून घ्या, असे सांगितले. फरहा शेख यांनीही मनोगत व्यक्त केले.‘लोकमत’ आणि रेझोनन्स स्टडी सेंटर आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमच्या पाल्याचे कौतुक तर झालेच; पण सोबतच योग्य मार्गदर्शनामुळे क रिअरकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोनही मिळाला, अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी दिली. यावेळी गुणवंतांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रेझोनन्सचे आदित्य देशपांडे आणि शोएब मोहम्मद यांची यावेळी उपस्थिती होती.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी