शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

काळजी घ्या! पाण्याची ५ ते ८ दिवस प्रतीक्षा, साठवलेल्या पाण्यातूनच ‘डेंग्यू’ पसरतो

By संतोष हिरेमठ | Updated: May 16, 2024 15:28 IST

राष्ट्रीय डेंग्यू दिन विशेष: पाणी झाकून साठविण्याकडे दुर्लक्ष; वर्षभरच ‘डेंग्यू’चे रुग्ण, स्वच्छ पाण्यातच होते या डासांची उत्पत्ती

छत्रपती संभाजीनगर : शहरात काही भागांत ५ दिवसांआड, तर काही भागांत ८ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाणी साठवून वापरल्याशिवाय पर्याय नाही. मात्र, याच साठवून ठेवलेल्या स्वच्छ पाण्यात ‘डेंग्यू’च्या डासांची उत्पत्ती होते आणि नागरिकांना आजाराला तोंड द्यावे लागत असल्याची परिस्थिती आहे.

दरवर्षी १६ मे रोजी ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ पाळला जातो. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी आणि हा आजार किती गंभीर असू शकतो, याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. डेंग्यूचे रुग्ण आता वर्षभरच कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. अगदी उन्हाळ्यातही डेंग्यूच्या रुग्णांचे निदान होत आहे.

डेंग्यू होण्याची कारणे- डेंग्यू हा आजार डेंग्यूच्या विषाणूमुळे होतो.- हा विषाणू एडिस इजिप्ती डासाच्या चाव्याद्वारे पसरतो.- डेंग्यूची लागण झालेल्या दर चारपैकी एक व्यक्ती आजारी असण्याची शक्यता असते.- डेंग्यूची लागण झालेल्या लोकांची लक्षणे सौम्य किंवा गंभीर असू शकतात.

डेंग्यूची ही आहेत लक्षणे...- डेंग्यूचे सर्वांत सामान्य लक्षण म्हणजे ताप.- तीव्र डोकेदुखी, अशक्तपणा, उलट्या, मळमळ, वेदना, पुरळ ही लक्षणेही दिसतात.- गंभीर लक्षणांमध्ये उलट्या होणे, पोट दुखणे, हिरड्या आणि नाकातून रक्त येणे यांचा समावेश होतो.- रुग्णाला थकवा, अस्वस्थता आणि चिडचिडदेखील होऊ शकते.

साठवलेले पाणी झाकून ठेवाडेंग्यू नियंत्रणासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. साठविलेले पाणी झाकून ठेवले पाहिजे, त्यातून त्यात डास उत्पत्ती होणे टळते, असे जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य पर्यवेक्षक बी. बी. पाटील म्हणाले, तर डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत जनजागरण करणार आहोत, असे जिल्हा हिवताप अधिकारी रवींद्र ढोले यांनी सांगितले.

डेंग्यूची रुग्णसंख्या-२०१९ : ५२७-२०२० : ४८-२०२१ : ११७- २०२२ : १०८-२०२३ : ४१५- २०२४ : २९ ( १४ मे पर्यंत)

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्यdengueडेंग्यू