शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नशेची औषधे मुलांना विकाल तर खबरदार ! सीसीटीव्ही लावण्याकडे मेडिकल चालकांचे दुर्लक्ष

By साहेबराव हिवराळे | Updated: July 15, 2023 19:14 IST

सीसीटीव्ही नसल्याने दुकानात कोण आला आणि कोण औषधे घेऊन गेला हे पथकाला समजत नाही

छत्रपती संभाजीनगर : नशेच्या औषधांची विक्री थांबविण्यासाठी राज्य शासनाने औषध विक्री दुकानांना किमान दोन सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. मोठे दुकानदार सोडले तर किरकोळ विक्रेत्यांना हा महागडा खर्च पेलवत नाही, असे म्हटले जाते. परंतु, सीसीटीव्ही नसल्याने दुकानात कोण आला आणि कोण औषधे घेऊन गेला हे पथकाला समजत नाही किंवा त्याचा थांगपत्ताही लागत नाही. परंतु, नियमित तपासणी व रेड टाकण्यासाठी अनेक बाबींवर लक्ष ठेवणे पथकांना गरजेचे असून, लहान मुलांना नशेच्या गोळ्या घेण्यापासून वाचवू शकतो, असा उद्देश असला तरी बहुतांश औषध दुकानांनी सीसीटीव्ही बसविलेले दिसत नाहीत.

नशेच्या औषधांवरील नियंत्रणासाठी सीसीटीव्हीची सक्ती...नशेच्या औषधांच्या विक्रीसाठी बंदी असून, वैद्यकीय प्रीस्क्रिप्शन दिल्याशिवाय नशेच्या गोळ्या कुणी दिल्यास त्याच्यावर एफडी तसेच मेडिकल असोसिएशन कडक कारवाई करण्याच्या भूमिकेत आहेत. त्यासाठी सीसाीटीव्ही बसविणे गरजेचे आहे.

दोन सीसीटीव्ही हवेच दुकानात दिवसभरात कोणत्या व्यक्तीने किती व कोणत्या प्रकारची औषधे नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते. किमान दोन सीसीटीव्ही दुकानदाराकडे असावेच. त्याच्याही ते फायद्याचे आहे.

काही औषधांचा नशेसाठी वापरबटण गोळ्या व व्हाइटनर, पंक्चर काढण्यासाठी लागणारे सोल्युशन, खोकल्याचे औषध, वेदनाक्षम औषधे यांचा काही जण नशेसाठी वापर करतात.

तर मेडिकल्सवर कारवाई लहान मुलांना नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दुकानावर व त्या व्यावसायिकावर कडक कारवाई करण्यात येते. दुकानदाराचे सभासदत्वही मेडिकल असोसिएशन रद्द करणार आहे.

छोट्या दुकानांना सीसीटीव्ही कसा परवडेल? छोट्या दुकानाला सीसीटीव्ही कसा परवडेल, असे असोसिएशन व मेडिकल चालकांचेही म्हणणे आहे.

अनेक मेडिकल्समध्ये सीसीटीव्हीच नाही अनेक किरकोळ मेडिकलमध्ये सीसीटीव्हीच बसविलेले नाहीत. नशेच्या गोळ्या विकत नाही तर सीसीटीव्ही बसविण्याची आवश्यकता नाही, असेही दुकानदार सांगतात.

कुणी स्वत:च्या पोटावर कशाला मारून घेईल...शक्यतो कुणीही नशेच्या गोळ्या विकत नाहीत. दोषींवर प्रशासन कारवाई करणार आहे. दुकानाचा परवाना व सदस्यत्व रद्द होईल.- विनोद लोहाडे, सचिव, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन

पथक तयारच आहे...जेथेही गोळ्यांची स्ट्रीप पकडली व कंपनीला पथक पाठविले की तो स्टॉक आम्ही मराठवाडासाठी दिलेला नाही, असे उत्तर येते. कारवाईसाठी पथक तयार आहे.- शाम साळे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी

टॅग्स :Drugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद