शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

सावधान ! उघड्यावरचे खाताय?; स्ट्रीट फुडमधून पोटात काय-काय जातंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 19:39 IST

जागतिक अन्न सुरक्षा दिन विशेष: लोकमतच्या पाहणीत अन्नसुरक्षेबाबत धक्कादायक वास्तव समोर

- प्राची पाटीलछत्रपती संभाजीनगर : अन्नावर घोंगावणाऱ्या माशा, खालून वाहणारे सांडपाणी, कचरा, खरकटे अन्न, तंबाखूने रंगलेले रस्ते अशा घाणेरड्या आणि अस्वच्छ वातावरणात शहरातील निम्म्याहून अधिक नागरिक आपले पोट भरत आहेत. ही दयनीय स्थिती शहरातील सुमारे ७० टक्के भागांमध्ये दिसून आली. जागतिक अन्नसुरक्षा दिनानिमित्त ‘लोकमत’ प्रतिनिधीने शहरातील मोक्याच्या ठिकाणी पाहणी केली. यावेळी अन्नसुरक्षेचे नियम सर्रासपणे पायदळी तुडविले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. कुठलीही स्वच्छता न पाळता अन्न तयार केले जात आहे. अशा प्रकारचे अन्न खाल्ल्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो, असा थेट इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

शहरातील बसस्थानकांबाहेरचे दृश्य पाहिले तर लक्षात येते की नागरिक कोणत्या प्रकारचे अन्न खाऊन आपली भूक भागवत आहेत. सकाळपासून तयार करून उघड्यावर ठेवलेले, तळलेले, धूळ आणि हवेतील विषारी कणांनी भरलेले पदार्थ मोठ्या प्रमाणावर विकले जात आहेत. अन्न बनवतानाही स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष होते. विक्रीचा परिसर, स्वच्छता आणि अन्न बनवण्याची पद्धत हे सर्व घटक अत्यंत चिंताजनक आहेत.

वाहणारे सांडपाणी आणि खाद्यपदार्थसिडको बसस्थानकासमोर सुमारे ११ स्टॉल्सवर ऑम्लेट, समोसा, वडापाव, पकोडे, पावभाजी, पाणीपुरी, असे विविध पदार्थ विकले जातात. मात्र, याच परिसरात सांडपाणी, तंबाखूने थुंकलेली घाण, कचरा असे वातावरण असते. स्वच्छतेची तपासणी करण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासन विभागाची असली तरी त्यांचे काम संथगतीने सुरू असते.

पुन्हा पुन्हा वापरले जाणारे तेलशहरातील अनेक स्टॉल्समध्ये एकच तेल अनेकवेळा वापरले जाते. यामुळे तेलाचा दर्जा खालावतो व त्यात हानिकारक पदार्थ तयार होतात. परिणामी, हृदयरोग, कर्करोग व अन्य गंभीर आजारांचा धोका वाढतो. ग्राहकांची कोणतीही काळजी घेतली जात नाही. अन्न व औषधी प्रशासनही याला तितकेच जबाबदार आहे.

अशा अस्वच्छतेची ठिकाणे: सिडको, मध्यवर्ती बसस्थानक, औरंगपुरा, कॅनॉट प्लेस, सिटी चौक, रोशन गेट, शहाबाजार, रेल्वे स्टेशन रोड

कारवाई सुरू असतेअन्न व औषधी प्रशासन विभाग दर्गा रोड, कॅनॉट प्लेस, टीव्ही सेंटर, जाधववाडी परिसरात जनजागृती मोहीम राबवते. नुकतीच दर्गा परिसरात स्टॉल्सवर अन्न तपासणी केली आहे. स्ट्रीट फूड संदर्भात आमच्या विविध मोहिमा सुरू असतात. लायसन्स तपासणीही केली जाते. वेगवेगळे नमुने तपासणीसाठी घेतले जातात.- दयानंद पाटील, सहायक आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन

२०२४ ते मे २०२५ पर्यंतची आकडेवारी२०२४ -४९ कारवायामे २०२५ पर्यंत-१५ कारवाया

कॅन्सर होण्याची शक्यताअनेक खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समध्ये एकच तेल वारंवार वापरले जाते. खाण्याचा रंग, साखर, मीठ, तेल या सर्व घटकांचे प्रमाणही जास्त असते. या सर्व गोष्टींची परिणीती पुढे जाऊन कर्करोगामध्ये होऊ शकते. यामुळे आतड्याचा, पोटाचा, स्तनांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. शक्यतो उघड्यावरचे खाणे टाळायला हवे.-डॉ. अरविंद गायकवाड, ओएसडी (स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट)

टॅग्स :foodअन्नchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर