शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

देशासाठी महत्त्वाकांक्षी बना

By admin | Updated: June 23, 2016 01:40 IST

औरंगाबाद : इंग्रजी ही जगाची भाषा आहे. ही भाषा प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे. देशासाठी प्रत्येकाने महत्त्वाकांक्षी होऊन न थकता रात्रंदिवस काम करावे

औरंगाबाद : इंग्रजी ही जगाची भाषा आहे. ही भाषा प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे. देशासाठी प्रत्येकाने महत्त्वाकांक्षी होऊन न थकता रात्रंदिवस काम करावे, असा सल्ला सेवानिवृत्त विदेश सचिव तथा अमेरिका, चीन येथे भारताच्या राजदूत राहिलेल्या निरुपमा राव यांनी शहरातील महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला.पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने ताज हॉटेलजवळील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंटच्या सभागृहात निरुपमा राव यांचे ‘निरुपम संवाद : वेध व्यक्तिमत्त्वाचा’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. केवळ महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस यांच्यासाठी हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अपर्णा अमितेशकुमार, नाथ व्हॅली हायस्कूलचे प्रायार्य रणजित दास आणि मोनिका दास यांची उपस्थिती होती. याप्रसंगी निरुपमा राव म्हणाल्या की, ४० वर्षांपूर्वी मी या शहरात राहत होते. येथील विद्यापीठात एम. ए. इंग्रजीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. या शहराशी आपले जुने नाते असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. इंटरनेट, सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमुळे आता विविध देशांच्या सीमा धूसर झाल्याचे त्यांनी नमूद केले. विदेश सेवेसाठी होती लग्न न करण्याची अटया कार्यक्रमास पोलिसांच्या गणवेशात मोठ्या प्रमाणात महिला अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असल्याचे पाहून अभिमान वाटत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, मी जेव्हा विदेश सेवेसाठी अर्ज दाखल केला तेव्हा लग्न न करण्याची अट होती. आपल्याला ही अट मान्य असल्याचे त्यात नमूद केले होते. त्यावेळी आपल्यासोबत कार्यरत असलेल्या दोन महिला अधिकाऱ्यांना लग्नामुळे आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले होते. पुढे दोन वर्षांनंतर ही अट रद्द झाली.प्रास्ताविक पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी के ले. सूत्रसंचालन गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी केले. आभार वाहतूक शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी मानले. (पान २ वर)कोणत्या देशात महिलांना सर्वाधिक स्वातंत्र्य आहे, असा प्रश्न एका महिला पोलिसाने विचारला असता त्या म्हणाल्या की, स्वातंत्र्याची तुमची व्याख्या काय आहे? महिलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षणाचे तसेच आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी आणि सुरक्षितता म्हणजे स्वातंत्र्य आहे, असे आपले मत आहे. त्यानुसार पाश्चिमात्य देशातील महिलांची सरासरी परिस्थिती चांगली आहे. ४चीनेही महिलांवरील बंधने हटविलेली आहेत आणि भारतातही महिलांना स्वातंत्र्य असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण आशियातील आपल्या शेजारील पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश, श्रीलंका इ. देशांतील महिलांवर विविध बंधने असल्याचे त्यांनी नमूद केले. औरंगाबादशी ऋणानुबंधनिरुपमा राव यांचे औरंगाबादशी जुने संबंध आहेत. त्यांचे वडील लष्करात कार्यरत होते. त्यावेळी त्या छावणीतील मिलिटरी एरियात राहत होत्या. ४० वर्षांपूर्वी औरंगाबादेत राहत असताना त्यांनी येथील विद्यापीठातून एम. ए. इंग्रजी ही पदवी प्राप्त केली. येथे राहूनच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि भारतीय लोकप्रशासन सेवेच्या १९७३ सालच्या बॅचच्या त्या अधिकारी झाल्या. त्यांनी पसंतीने विदेश सेवा निवडली.