शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

माणदेशी फाऊंडेशनचा आधार

By admin | Updated: September 4, 2015 00:28 IST

लातूर : माणदेशी फाऊंडेशनने दिलेले व्यावसायिक प्रशिक्षण आणि बिनव्याजी कर्जामुळे जिल्ह्यातील १२ जणींचा व्यवसाय आकाराला आला आहे.

लातूर : माणदेशी फाऊंडेशनने दिलेले व्यावसायिक प्रशिक्षण आणि बिनव्याजी कर्जामुळे जिल्ह्यातील १२ जणींचा व्यवसाय आकाराला आला आहे. फाऊंडेशनच्या मदतीमुळे या गृहिणी आता व्यावसायिक झाल्या आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची व पोट मजुरीवर असलेल्या कुटुंबातील गृहिणींचे बचत गट करून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा उपक्रम दीपशिखा प्रकल्पाने राबविला. त्यासोबतच माणदेशी फाऊंडेशनने प्रशिक्षण दिलेल्या महिलांना बिनव्याजी कर्जही उपलब्ध करून दिले. त्यामुळे मजुरीने जात असलेल्या १२ जणींचा वेगवेगळा व्यवसाय मोठा आकार घेत आहे. रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील कांचन मुरलीधर मोतीपल्ले यांनी माणदेशी फाऊंडेशनच्या कर्जावर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांचे पती अपघातात अपंग झाले. परंतु, ‘माणदेशी’मुळे कांचनतार्इंचा भाजीपाल्याचा व्यवसाय चांगला सुरू असल्याने अंथरुणावर असलेल्या पतीलाही त्या मदत करू शकल्या. आता कांचनताई रेणापूर व किनगाव येथे भाजीपाल्याचे दुकान सुरू करण्याच्या विचारात आहेत. हे त्यांना ‘दीपशिखा’मुळे साध्य करता आले आहे. रेणापूर तालुक्यातील चाडगाव येथील शकुंतला माने यांचे किराणा दुकान, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील होनमाळ येथील आशाबी मैनोद्दीन सय्यद यांची पिठाची गिरणी, होनमाळ येथीलच भाग्यश्री सिद्धेश्वर हाळणे यांचा सुतळीचा व्यवसाय, कांता हरणे यांचे शेळीपालन, शिवपूर येथील शोभा टोपे यांचा शिवणकाम व पिठाची चिक्की, आनंदवाडी येथील अनुसया शिरूरे यांचे स्टेशनरी दुकान, अनिता सोमनाथ दवणे यांचा शेंगदाणे विक्री, येरोळ येथील अंजली पालकर यांचा भाजीपाला व्यवसाय, गणेशवाडी येथील सुनीता पेठे यांचा शेंगालाडू, होनमाळ येथील अरुणा शिंदे यांचा शिलाई, रुखवताचे साहित्य आणि खरोळा येथील सुरेखा कागले यांचा शिलाईचा व्यवसाय माणदेशी फाऊंडेशनच्या मदतीमुळे जोरात सुरू आहे. (प्रतिनिधी)