शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
4
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
5
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
6
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
7
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
8
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
9
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
10
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
11
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
12
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
13
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
14
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
15
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
16
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
17
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
18
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
19
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
20
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी

बोगस कागदपत्रांच्या आधारे सैन्यात भरती झालेल्या ३७ जवांनाना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 19:08 IST

बनावट रहिवासी प्रमाणपत्र आणि राष्ट्रीयत्वाचा दाखल सादर करून भारतीय सैन्य दलात दाखल झालेल्या ३७ जवांनाना छावणी पोलिसांनी बुधवारी ( दि. ९ ) अटक केली.

ठळक मुद्दे २०१५ मधील नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात औरंगाबादेत भारतीय सैन्य दलाचा भरती मेळावा झाला होता.२३ मे २०१६ रोजी कॅप्टन मोहनपाल सिंग यांच्या तक्रारीवरुन छावणी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.बनावट सही, शिक्का वापरूनबनवले प्रमाणपत्र

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. १० :  बनावट रहिवासी प्रमाणपत्र आणि राष्ट्रीयत्वाचा दाखल सादर करून भारतीय सैन्य दलात दाखल झालेल्या ३७ जवांनाना छावणी पोलिसांनी बुधवारी ( दि. ९ ) अटक केली. या आरोपींना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. गतवर्षी २३ मे २०१६ रोजी कॅप्टन मोहनपाल सिंग यांच्या तक्रारीवरुन याविषयी छावणी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

याविषयी अधिक माहिती देताना छावणी पोलिसांनी सांगितले की,  २०१५ मधील नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात औरंगाबादेत भारतीय सैन्य दलाचा भरती मेळावा झाला होता. या मेळाव्यात हजारो तरूण सहभागी झाले होते. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची सैन्य दलाने  निवड केली होती. त्यांनी दाखल केल्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी छावणीतील सैन्य भरती अधिका-यांनी केली.यावेळी ३७ उमेदवारांनी उमेदवारांनी औरंगाबाद,वैजापुर, धुळे, चाळीसगाव, साक्री आदी ठिकाणच्या तहसील कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र व  राष्ट्रीयत्वाचा दाखला सादर केल्याचे समोर आले. 

उमेदवारांच्या कागदपत्राविषयी शंका वाटत असल्याने कॅप्टन मोहनलपाल सिंग यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन याविषयी तक्रार दिली होती. आयुक्तांनी हे प्रकरण चौकशीसाठी आर्थिक गुन्हेशाखेकडे सोपविले होते. पोलीस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांनी या तक्रारीच्या अनुषंगाने प्राप्त कागदपत्र व  उमेदवारांनी सैन्य दलास सादर केलेले रहिवासी आणि राष्ट्रीयत्वाचा दाखल्याची सत्यता पडताळण्यात आली. ज्या कार्यालयाचे प्रमाणपत्र सादर केले त्या कार्यालयास पत्र पाठवून त्यांनी त्यांची सत्यता तपासली असता ३७ उमेदवारांनी दाखल केलेले राष्ट्रीयत्वचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले.

आरोपींनी संबंधित तहसील कार्यालय, उपविभागीय अधिका-यांचा बनावट सही शिक्का वापरून हे प्रमाणपत्र तयार केल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी गतवर्षी २३ मे  २०१६ रोजी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आणि याबाबतचा अहवाल सैन्य दलास देण्यात आला होता. दरम्यान या सर्व आरोपींना छावणी पोलिसांनी बुधवारी अटक केली.या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावल्याची माहिती पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी दिली. ते म्हणाले की, या आरोपींना आज गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. 

बनावट सही, शिक्का वापरून बनवले प्रमाणपत्रयातील काही आरोपी जवान हे मूळचे सोलापुर, कोल्हापुर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. यातील ११ जवानांनी वैजापुर तहसील कार्यालयाचे, अन्य ११ जवानांनी औरंगाबाद तहसील कार्यालयाचे तर उर्वरित आरोपींनी जहगाव, धुळे, चाळीसगाव आणि साक्री तहसीलचे बनावट प्रमाणपत्र जोडले होते.