लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी या प्रवर्गातील नागरिकांचा आजही विकास झालेला नाही़ याचे मूळ कारण जातीव्यवस्थेचा पगडा हे आहे. भारताच्या विकासात जातीव्यवस्थेचा मोठा अडथळा दिसून येत आहे़, असे प्रतिपादन नियोजन आयोगाचे माजी सदस्य तथा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ़भालचंद्र मुणगेकर यांनी केले़ शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयात रविवारी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नियोजन आयोगाचे माजी सदस्य तथा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु, माजी खा़ डॉ़ भालचंद्र मुणगेकर यांच्या व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन समता अभियानाच्या वतीने करण्यात आले होते़ मंचावर प्राचार्य अशोक आहेर, डॉ़ परमेश्वर साळवे, प्राचार्य नितीन लोहट, गौतम मुंढे, इंजि़ एम़ एम़ भरणे, समता अभियानाचे राहुल मोगले यांची उपस्थिती होती़ कार्यक्रमास परभणी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासात जातीव्यवस्थेचा अडथळा
By admin | Updated: June 25, 2017 23:23 IST