शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

संस्थान गणपती मंदिरातील दानपेटी पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 18:32 IST

राजाबाजार संस्थान गणपती मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरून नेली. यात जवळपास ३० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

चोरट्यांनी गाठला कळस : वर्दळीच्या मंदीरातून पहाटे दान पेटी पळविल्याने भाविकांमध्ये संतापऔरंगाबाद : राजाबाजार संस्थान गणपती मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरून नेली. यात जवळपास ३० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. रविवारी पहाटे साडेचार ते पावणे पाच वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली. दानपेटी पळविणारे दोन चोरटे आणि त्यांची रिक्षा सीसीटिव्हीत कैद झाली असून, पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

शहराचे आराध्य दैवत म्हणून राजाबाजार येथील संस्थान गणपती ओळखले जाते. संस्थान गणपती चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने या जुन्या मंदिराची देखरेख केली जाते. मंदिराच्या सुरक्षेसाठी व्यवस्थापनाच्यावतीने एक सुरक्षा रक्षक नियुक्त केला होता. मात्र, दीड ते दोन महिन्यांपूर्वी सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. तेव्हापासून सिटीचौक पोलिसांचा एक गार्ड नियमित मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असतो. शिवाय सीसीटिव्ही कॅ मेरेही मंदिरात बसविण्यात आले आहेत.

सिटीचौक ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी पहाटे चार वाजेपर्यंत मंदिरासमोर बसून होते. साडेचार वाजेच्या सुमारास दुध विक्रेते, वर्तमानपत्र विक्रेते, मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ सुरू झाल्याचे पाहून संबंधित पोलीस कर्मचारी ठाण्यात गेला. त्यानंतर रिक्षातून आलेल्या दोन चोरट्यांनी मंदिराच्या दारातील दानपेटी चोरून नेली. सकाळी ८ वाजेच्या सुमारास मंदिराचे विश्वस्त रमेश राधाकिसन घोडेले हे दर्शनासाठी मंदिरात गेले तेव्हा त्यांना तेथे दानपेटी दिसली नाही. त्यांनी या घटनेची माहिती लगेच मंदिरााचे अन्य विश्वस्त आणि पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक डी.एस. सिनगारे आणि कर्मचाºयांनी राजाबाजार येथे धाव घेऊन पहाणी केली. याप्रकरणी रमेश घोडले यांच्या तक्रारीवरून सिटीचौक ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बांगर हे तपास करीत आहे.

चोरटे सीसीटीव्ही कै दसंस्थान गणपती विश्वस्त मंडळाने मंदीर आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या सीसीटिव्ही कॅमेºयात दोन्ही चोरटे आणि त्यांची दानपेटी चोरून नेण्यासाठी वापरलेली रिक्षा कैद झाली. हे सीसीटिव्हीचे फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे. गुन्हेशाखा आणि सिटीचौक पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद