शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
2
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
3
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
4
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
5
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
6
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
8
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
9
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
10
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
11
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
12
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
13
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
14
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
15
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
16
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
17
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
18
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
19
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
20
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO

बापरे! बाळाच्या आगमनाच्या आनंदातही ३२ टक्के गर्भवती कौटुंबिक हिंसाचारग्रस्त

By संतोष हिरेमठ | Updated: July 17, 2024 20:00 IST

गर्भपात, मुदतपूर्व प्रसूतीचा धोका : गर्भातील बाळाच्याही आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती

छत्रपती संभाजीनगर : बाळाच्या आगमनाच्या आनंदातही ३२ टक्के गर्भवती महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागत असल्याची धक्कादायक बाब घाटीतील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाने केलेल्या एका अभ्यासातून उघडकीस आली आहे. गरोदरपणात महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते, परंतु कौटुंबिक हिंसाचारामुळे त्यांना ताण-तणाव, चिंता, आणि इतर शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे गर्भातील बाळावरही विपरीत परिणाम होण्याचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

घाटीतील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात ‘मुक्ता’ हा प्रकल्प राबविण्यात येतो. जागतिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णालयात येणारी महिला कौटुंबिक हिंसाचाराला तर सामोरे जात नाही ना, याची पडताळणी केली जाते. ही पडताळणी करताना महिलेस थेट विचारणा केली जात नाही. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या भेटीदरम्यान तिच्यात कौटुंबिक हिंसाचारासंदर्भात काही लक्षणे दिसली तर विश्वासात घेऊन विचारणा होते. गरोदर मातेने स्वत:हून माहिती दिली तर तिचे समुपदेशन केले. तिने परवानगी दिली तर कुटुंबीयांचेही समुपदेशन केले जाते. कौटुंबिक हिंसाचाराची व्याप्ती अधिक असेल तर ‘प्रोटेक्शन ऑफिसर’ला माहिती दिली जाते. हे अधिकारी परिस्थितीनुसार मातेच्या घरी भेट देतात. मातांच्या समुपदेशनासाठी अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. श्रीनिवास गडप्पा, डाॅ. विजय कल्याणकर, डाॅ. प्रशांत भिंगारे, डाॅ. अनुराग सोनवणे, डाॅ. रुपाली गायकवाड आदी प्रयत्नशील असतात.

किती महिलांचा अभ्यास?या अभ्यासात ९९० महिलांचा अभ्यास करण्यात आला. यातील ३२ टक्के महिलांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे घरगुती हिंसाचाराला सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग दर ४ वर्षांनी असा अभ्यास करतो. गरोदरपणात अधिक उलट्या होणे, मळमळ होणे, वारंवार रुग्णालयात येण्याची वेळ येणे, यासह काही बाबीतून कौटुंबिक हिंसाचार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मातेने होकार दिला तरच अधिक विचारणा केली जाते. कौटुंबिक हिंसाचारामुळे गर्भपात, मुदतपूर्व प्रसूती, प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्राव, गर्भातील बाळावर परिणाम होण्याची भीती नाकारता येत नाही, असे डाॅ. गडप्पा म्हणाले.

कौटुंबिक हिंसाचारात काय?महिलेला मारहाण, आर्थिक छळ, मानसिक त्रास, वारंवार टोमणे, भावनिक त्रास या बाबी कौटुंबिक हिंसाचारात मोडल्या जात असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. महिलांच्या सन्मानासाठी त्यांच्या आणि गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठी घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने अमलात आणणे गरजेचे आहे. तसेच, महिलांना आपले हक्क आणि अधिकारांची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून त्या अशा हिंसाचाराला सामोरे जाऊ नयेत.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबादpregnant womanगर्भवती महिला