शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जासाठी बँकांचा हात आखडता; शेतकरी खाजगी सावकारांच्या जाळ्यात अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 19:19 IST

राष्ट्रीयीकृत बँकांनी किती कर्ज वाटले याचा आकडासुध्दा सहकार खात्याला या बँकांनी दिलेला नाही.

पैठण : खरीप हंगामासाठी दिलेल्या टार्गेट पैकी केवळ २०% कर्ज वाटप करणाऱ्या बँकांनी आता रब्बी हंगामासाठी मात्र आखडता हात घेतल्याने परिस्थितीने पिचलेल्या शेतकऱ्यांना खाजगी सावकाराचे दार ठोठावण्याची दुर्देवी वेळ आली आहे. राष्ट्रीयकृत बँका प्रशासनास जुमानत नाही यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात कर्ज पडत नसल्याचे वास्तव सहकार खात्याचे अधिकारी खाजगीत व्यक्त करीत आहेत. राष्ट्रीयकृत बँकेच्या बाबतीत जिल्हाधिकारी यांना कारवाईचा अधिकार असून जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

पैठण तालुक्यात खरिपाच्या सुरवातीला कडक दुष्काळ तर शेवटी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाची नासाडी होऊन शेतकरी मोडून पडला. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना ५१ कोटी कर्ज वाटपाचे उद्देश तालुक्यातील बँकांना देण्यात आले होते.पैठण तालुक्यात औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५ शाखा असून या अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीची संख्या ९० ईतकी आहे. सोसायटी अंतर्गत ४५९७५ सभासद शेतकरी आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या २१ आहे. खाजगी व व्यापारी बँका ५ असून ग्रामीण बँका ४ आहेत. या बँकांनी व्यवस्थित कर्जवाटप केलेतर शासनाचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट सहज साध्य होते.  या बँका पैकी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोडली तर ईतर बँका मात्र शेतकऱ्यांना कर्जवाटप करत नसल्याचे दिसून आले आहे. खरीपाच्या ५१ कोटी पैकी पैठण तालुक्यात औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने १२ कोटी ३१ लाख ६६ हजार रूपयाचे कर्ज ३४६६ शेतकऱ्यांना वाटले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी किती कर्ज वाटले याचा आकडासुध्दा सहकार खात्याला या बँकांनी दिलेला नाही.

रब्बीसाठी तर नकारचरब्बी हंगामासाठी १० कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले आहे.परंतू आजपर्यंत केवळ १ कोटी ३१ लाख रूपयाचे कर्ज वाटप ३३० शेतकऱ्यांना झाले आहे. परिस्थितीने शेतकऱ्यांच्या शेतात व पदरातही आता काहीच शिल्लक उरलेले नाही. रब्बीचे कर्ज पदरात पडले तरच पेरणी होईल अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीतून सावरून न्यायचे असेल तर शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय आतातरी शिल्लक राहिलेला दिसून येत नाही. राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्जासाठी अप्रत्यक्षपणे नकार देत असून बँकेत  चकरा माराव्या लागत असल्याचे दत्ता फासाटे,  सुभाष म्हस्के, सुदाम बोबडे, आकाश सरोदे, पिराजी गायकवाड, विलास निर्मळ, बालकिसन गोर्डे, बापू कदम अशा अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.

बँकांचा प्रतिसाद नाही औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक व ईतर सहकारी बँकेमार्फत शेतकऱ्यांना व्यवस्थित कर्ज वाटप करण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत बँका या कर्जवाटपास प्रतिसाद देत नाही असे दिसून आले आहे. बँकनिहाय कर्ज वाटपा बाबत राष्ट्रीयकृत बँकांकडून माहिती मागविण्यात आली आहे. - दिलीप गौंडर, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पैठण

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरीagricultureशेतीbankबँक