शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक मंदीवर बँकांत मंथन सुरू; सरकारला सुचवणार उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 16:09 IST

मंदीमुळे अनेक कारखाने बंद पडत आहेत.कामगारांना नोकरीवरून कमी केले जात आहे. 

ठळक मुद्देअहवालावरून केंद्र शासन ठरविणार  धोरण ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वाधिक मंदीचा फटका बसला आहे. तयार उत्पादन पडून असल्याने नवीन उत्पादन करणे बंददेशात अनेक शोरूम बंद झाल्या आहेत.

औरंगाबाद : आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तर दुसरीकडे मंदीने अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे.  मंदीचे नेमके कारण व त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याविषयी ग्राऊंड लेव्हलवरून माहिती घेण्याचे आदेश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व १७ राष्ट्रीयीकृत बँकांना दिले आहेत. त्यानुसार सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी विभागनिहाय दोनदिवसीय मंथन बैठका घेणे सुरू केले आहे. शहरातही बैठका घेण्यात आल्या असून, त्यात शाखा व्यवस्थापकांनी अनेक उपाय, सूचना मांडल्या. 

सध्या मंदीचा मोठा परिणाम जाणवत आहे. या मंदीतून पुन्हा  अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी  केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना दीर्घकालीन व तत्कालीन उपाययोजना कोणत्या कराव्यात याचा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार १७ राष्ट्रीयीकृत बँका ग्राऊंड लेव्हलपासून अहवाल तयार करण्यास लागल्या आहेत. यानिमित्ताने  शहरात स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्रसह अन्य राष्ट्रीयीकृत बँकांच्या विभागीय मंथन कार्यशाळा सुरू आहेत. दोन दिवसांच्या या कार्यशाळेसाठी प्रत्येक शाखा व्यवस्थापकांना आमंत्रित केले आहे.  प्रत्येक बँकेच्या मुख्यालयातून अधिकारी शहरात दाखल झाले आहेत. व्यवस्थापकांचे गट तयार करून त्यांना विविध विषय देण्यात आले होते. त्याद्वारे त्यांनी आपले सादरीकरण केले. विभागीय कार्यशाळेतून प्राप्त झालेल्या सूचना, उपाय घेऊन हे अधिकारी राज्यस्तरावर बँकर्स कमिटीसमोर मांडणार आहेत. तेथे अहवाल तयार होईल.त्यानंतर राष्ट्रीयस्तरावर सर्व बँकांचे चेअरमन अहवाल सादर करतील. त्यातून एकत्र अहवाल तयार करून तो केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे सुपूर्द करणार आहेत. हा अहवाल समोर ठेवून केंद्र सरकार आर्थिक धोरण जाहीर करणार आहे. 

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी कर्जबँकेच्या विभागीयस्तरावरील दोनदिवसीय कार्यशाळेत आम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भात व्यवस्थापकांकडून सूचना मागविल्या. मोठ्या उद्योगांपेक्षा सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना जास्त कर्ज पुरवठा करणे, जेणेकरून रोजगार वाढेल, रोख रक्कम कमीत कमी वापरासाठी डिजिटल बँकिंग करण्यास ग्राहकांना प्रोत्साहन देणे, प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते उघडणे, रिअल इस्टेटवर भर, बँकेची सेवा ग्रामीण, दुर्गम भागांपर्यंत पोहोचविणे, शैक्षणिक कर्ज पुरवठा करणे, ज्याद्वारे जीवनस्तर उंचावेल आदींविषयी विचारमंथन झाले. यातील सूचना, उपाययोजनांविषयी आता राज्यस्तरीय बँकर्स समितीसमोर चर्चा करण्यात येईल. बी. एस. शेखावत, कार्यकारी संचालक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया

थकीत कर्ज वसूल करणे हाच उपाय कॉर्पोरेट क्षेत्राने मोठ्या प्रमाणात कर्ज थकविले आहे. तर छोट्या उद्योगांनी मंदीमुळे माना टाकल्या आहेत. बँकांचा एनपीए वाढला आहे. यामुळे बँका कर्ज देण्यास हात आखडता घेत आहेत. क्रेडिट वाढत नाही, ते कसे वाढवावे, यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या आदेशावरून राष्ट्रीयीकृत बँका मंथन कार्यशाळा घेत आहेत. मात्र, अशा कार्यशाळेतून काहीच निष्पन्न होणार नाही. मोठे थकीत कर्ज वसूल करण्यासाठी बँकांना पूर्ण अधिकार देणे आवश्यक आहे.  - देवीदास तुळजापूरकर, सरचिटणीस, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन

टॅग्स :bankबँकEconomyअर्थव्यवस्थाAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय