शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

डागी नोटा घेण्यास बँकांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:49 IST

डाग लागलेल्या किंवा पेनाने आकडे लिहिलेल्या ५००, २ हजार रुपयांचा नोटा खातेदारांकडून बँकेने स्वीकाराव्यात, असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत; मात्र शहरातील अनेक बँका या आदेशाला मानत नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डाग लागलेल्या किंवा पेनाने आकडे लिहिलेल्या ५००, २ हजार रुपयांचा नोटा खातेदारांकडून बँकेने स्वीकाराव्यात, असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत; मात्र शहरातील अनेक बँका या आदेशाला मानत नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे. कोणी डागी नोटा बँकेत आणल्या, तर कॅशिअर सरळ हात वर करीत आहेत. यामुळे या नोटांचे करायचे काय, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांवर लिहिले तर अशा नोटा बँका घेणार नाहीत, अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. यासंदर्भात आरबीआय (रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया) ने स्पष्ट केले आहे की, या नवीन नोटांवर काहीही लिहिले असले किंवा नोटांचा रंगही गेला असला, डाग लागलेला असला तरी बँका या नोटा नाकारू शकतनाहीत.एवढे स्पष्ट आदेश असतानाही शहरातील बँका अशा नोटा स्वीकारत नसल्याच्या तक्रारी ‘लोकमत’कडे आल्या होत्या. यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने विविध भागांतील काही राष्ट्रीयीकृत, खाजगी व नागरी सहकारी बँकांमध्ये चौकशी केली असता लोकांच्या तक्रारी तंतोतंत खºया असल्याचे आढळून आले. पैठणगेट ते निराला बाजारकडे जाणाºया मधल्या रस्त्यावर युनियन बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेतील कॅशिअरला आमच्या प्रतिनिधीने सांगितले की, माझ्याकडे २ हजार रुपयांच्या तीन नोटा आहेत, त्यास पेनाच्या शाईचे डाग पडले आहेत, त्या नोटा तुम्ही घ्याल का, यावर कॅशिअरने सरळ ‘नकार’ दिला. आम्ही अशा नोटा स्वीकारत नाही, असे त्याने सांगितले. मिलकॉर्नर येथील एसबीआय शाखेतील कॅशिअरला हाच प्रश्न विचारला, तेव्हा तिथे कॅशिअर असलेल्या तरुणीने सांगितले की, तुम्ही मला नोटा आणून दाखवा मी आमच्या शहागंज शाखेतील बँकेत चौकशी करते, तेथील अधिकाºयांनी होकार दिला, तर तुमची नोट स्वीकारते. यानंतर रेल्वेस्टेशन रोडवरील ओमप्रकाश देवडा पीपल्स को-आॅपरेटिव्ह बँक (हिंगोली) येथील कॅशिअरने ‘कॅश डिपॉझिट मशीन (सीडीएम) मध्ये डागी नोट जमा करा, असा सल्ला दिला. अदालत रोडवरील पंजाब नॅशनल बँकेतील कॅशिअरने तर नोट स्वीकारण्यास नकार दिला व अमरप्रीत चौकातील एसबीआयच्या करन्सी चेस्टमध्ये नोटा जमा करण्याचे सांगितले.याच अदालत रोडवरील आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस बँक व समर्थनगर रोडवरील आयडीबीआय बँकेच्या कॅशिअरने ‘नोटा दाखवा, किती खराब आहेत ते पाहून आम्ही निर्णय घेऊ, असे सांगून सावध पवित्रा घेतला. एकंदरीत बँका ५०० व २ हजार रुपयांचा डागी नोटा किंवा पेनाने लिहिलेल्या नोटा जमा करून घेण्यास ‘टाळाटाळ’ करीत असल्याचे निदर्शनास आले. खराब झालेल्या, डागी नोटा, फाटलेल्या नोटा अनेक जणांकडे आहेत. दुकानदार या नोटा स्वीकारत नाहीत व बँका या नोटा खात्यात जमा करून घेत नाहीत, यामुळे या ‘नोटांचे’ करायचे काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.दरमहिन्याला जमा होतात २ लाखांच्या खराब नोटाअमरप्रीत चौकातील व शहागंज येथील एसबीआयच्या करन्सी चेस्टमध्ये यासंदर्भात चौकशी केली असता तेथील रोकड व्यवस्थापकाने सांगितले की, दोन्ही बँकांत दर महिन्याला प्रत्येकी १ लाख रुपयांच्या खराब नोटा जमा होत आहेत. यात ५०० व २ हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण अधिक आहे. यात शाईचे डाग लागलेल्या, पेनाने आकडे लिहिलेल्या, धुण्यात खराब झालेल्या, फाटलेल्या, एवढेच नव्हे, तर उंदरांनी कुरतडलेल्या नोटाही येतात, असेही नमूदकेले.बँकेच्या मॅनेजरने दिला अजब सल्लायुनियन बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेतील व्यवस्थापकांना आमचा प्रतिनिधी जाऊन भेटला, तेव्हा त्या व्यवस्थापकाने अशा शाईचा डाग असलेल्या नोटा बँकेत कशाला आणता, एक काम करा, तुम्ही पेट्रोलपंपावर या नोटा चालवा, मी सुद्धा माझ्याकडे अशीच सही केलेली नोट आली होती, मी पेट्रोलपंपावर चालविली, असा अजब सल्ला दिला. बँकेचे व्यवस्थापकच असे म्हणत असतील तर ‘आनंदी आनंदच’.एसबीआयच्या करन्सी चेस्ट येथील रोकड व्यवस्थापकाने सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार खराब नोटा स्वीकारण्याची प्रत्येक बँकेवर जबाबदारी आहे. त्यांनी आपल्या खातेदारांच्या खात्यात त्या नोटा जमा कराव्यात; पण पुन्हा चलनात आणू नयेत, मात्र बँका हात वर करतात व एसबीआयच्या करन्सी चेस्टकडे ग्राहकांना पाठवितात, हे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.