जाफराबाद : येथील राष्ट्रीयीकृत बँकांचे सर्व्हर डाऊन होण्याची मालिका थांबता थांबत नसल्याने ऐन मार्चएंडच्या धावपळीत बँक कर्मचाऱ्यांसोबतच ग्राहकांचे हाल सुरू आहेत. ग्राहकांना याचा चांगलाच फटका बसत आहे. गत वर्षापासून सर्व्हर डाऊन होण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवस सुट्या आल्याने मार्च अखेरीस खातेदारांना चकरा माराव्या लागत आहेत. शुक्र वारी सकाळपासून बँक बंद असल्याने व्यवहार थांबले आहेत. नेहमीच्या कटकटीस बँक अधिकारी देखील वैतागले आहेत. बँक अधिकाऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. बँकांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांना बँकांची मार्च अखेरची कामे करण्यासाठी एक आठवडा शिल्लक आहे. त्यात मध्ये तीन सुट्या आल्याने व्यवहार कसा करायचा याची अडचण कार्यालयांना आहे. बँकेचे स्थानिक अधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयास वेळोवेळी कळवून सुद्धा काही सुधारणा व कारवाई होत नाही. मात्र सर्व्हर डाऊन होण्याचा आर्थिक फटका बँके सह ग्राहकांना सहन करावा लागत आहे.जाफराबाद शहरात राष्ट्रीयीकृत बँकेच्या चार शाखा असून,गेल्या तीन महिन्यांपासून बँकेत कॅश उपलब्ध नसणे, कॅश आली तर सर्व्हर डाऊन होणे, रांगेत उभे राहून वेळेत कामे न होणे इ. कारणे पाहून ग्राहक अक्षरश: वैतागले आहेत. आमचेच पैसे वेळेत आम्हाला मिळत नाही, अशी भावना आता ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील बँक असल्याने वरिष्ठ अधिकारी वेळेत लक्ष देत नाही. त्यामुळे ग्राहक खाजगी बँक सारखा नवीन पर्याय शोधू लागला आहे. शनिवार, रविवार दोन दिवस सु्टी, पुढील आठवड्यात गुढीपाडवा, शुक्रवारी मार्चएण्ड येणार आहे. त्यात सर्व्हर डाऊन होणार नाही याची शाश्वती कोण घेणार, वर्षअखेरची कामे कशी होणार याची काळची ग्राहकांना करणे साहजिक आहे. बँकांमधील सर्व्हरची दुरूस्तीची मागणी होत आहे. (वार्ताहर)
बँक सर्व्हर डाऊनची मालिका थांबेना...!
By admin | Updated: March 25, 2017 00:01 IST