शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

अबब...२२३ महाविद्यालयांची युवक महोत्सवाकडे पाठ

By राम शिनगारे | Updated: October 3, 2023 21:08 IST

२५० महाविद्यालयांची नोंदणी : चार दिवस होणार विद्यापीठात कलाविष्कार

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवाला विद्यापीठात बुधवारपासून (दि.४) सुरुवात होत आहे. या महोत्सवात विद्यापीठाशी संलग्न ४७३ महाविद्यालयांपैकी फक्त २५० महाविद्यालयांनी नोंदणी केली. तर २२३ महाविद्यालयांनी महोत्सवाकडे पाठ फिरविल्याचे महोत्सवाच्या पुर्वसंध्येला स्पष्ट झाले. त्यातही २५० पैकी किती महाविद्यालये संघ पाठवितात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विद्यापीठात ४ ते ७ ऑक्टोंबर दरम्यान होणाऱ्या महोत्सवात सहा कला गटात ३६ प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. यासाठी सहा रंगमंच उभारले आहेत. यामध्ये नृत्य, नाटय, संगीत, वाड़ःमय, ललित कला व महाराष्ट्राच्या लोककलांचा समावेश आहे. त्यात एकुण ३६ कलाप्रकार असणार आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील एकुण २५० महाविद्यालयातील १३३७ मुली, ११७६ मुलांसह एकुण २५१३ विद्यार्थी सहभागी होत आहे. या विद्यार्थ्यांसोबत ४१८ महिला व पुरुषांचे संघ सहभागी असणार आहेत. दरम्यान, महोत्सवात सहभागी न होणाऱ्या महाविद्यालयांनी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला जात आहे.योगेश शिरसाठ यांच्या हस्ते उद्घाटन

मराठवाड्याचा भूमिपुत्र अभिनेते योगेश शिरसाठ यांच्या हस्ते युवक महोत्सवाचे नाट्यगृह परिसरातील सृजन रंगमंचावर बुधवारी सकाळी ११ वाजता उद्घाटन होईल. यावेळी अभिनेत्री अनुष्का सरकटे यांची प्रमुख उपस्थित असणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले असतील. यावेळी प्रकुलगुरू डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. योगिता होके पाटील, ॲड. दत्ता भांगे यांची उपस्थिती असणार आहे. त्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मुख्य रंगमंचापर्यंत शोभायात्रा निघणार आहे. समारोपाला अभिनेत्री वर्षा उसगांवकर, अभिनेते प्रवीण डाळींबकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

पत्रिकेच्या गोंधळाची परंपरा कायम

चार जिल्ह्यातील हजारो कलाकारांचा सहभाग असलेल्या महोत्सवाची निमंत्रण पत्रिका उद्घाटनाच्या पुर्वसंध्येपर्यंत कोणालाही प्राप्त झालेली नव्हती. नेहमीप्रमाणे पत्रिकांची छपाई एक दिवस आधी करण्यात आली. तर महोत्सवाच्या लोगोलाही शेवटच्या दिवशी मान्यता घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ठरविलेल्या पाहुण्याचे नावही पहिल्या पत्रिकेत चुकविल्यामुळे पुन्हा एकदा पत्रिकांची छपाई करावी लागली आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद